इंडियन प्रीमियर लीग २०२२चा हंगाम संपायला आला आहे. रविवारी (२९ मे) राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएलच्या पंधराव्या हंगामाचा अंतिम सामना रंगेल. या सामन्यादरम्यान राजस्थानचा धाकड सलामीवीर जोस बटलर याच्यावर सर्वांची नजर असेल. बटलर सध्या तुफान फॉर्ममध्ये असून त्याने आतापर्यंत ८०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे, यादरम्यान त्याने धावत जास्तीच्या एक किंवा दोन धावा न काढता चौकार आणि षटकारांनीच अधिक धावा बनवल्या आहेत.
बटलरने (Jos Buttler) या हंगामात १६ सामने ५८.८६च्या सरासरीने फलंदाजी करताना खोऱ्याने धावा ओढल्या आहेत. ४ शतके आणि ४ अर्धशतकांच्या मदतीने सर्वाधिक ८२४ धावांचा पल्ला त्याने गाठला आहे. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ७८ चौकार आणि ४५ षटकार निघाले आहेत. अर्थात बटलरने ८२४ धावांपैकी ५८२ धावा फक्त चौकार आणि षटकारांच्या (582 Runs By Boundary) मदतीने केल्या आहेत.
बटलरनंतर लखनऊ सुपरजायंट्सचा कर्णधार केएल राहुल ६१६ धावांसह आयपीएल २०२२ मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या दोघांव्यतिरिक्त इतर कोणताही फलंदाज ५१० धावांचा आकडा गाठू शकलेला नाही. लखनऊ संघाचा सलामीवीर क्विंटन डी कॉक ५०८ धावांसह या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
याचा अर्थ असा की, बटलरने जितक्या धावा चौकार आणि षटकारांच्या मदतीने काढल्या आहेत, तितक्या धावांपर्यंत राहुलला वगळता इतर कोणताही फलंदाज पोहोचू शकलेला नाही.
आयपीएल इतिहासात एका हंगामात फक्त तिसऱ्यांदा कोणत्या फलंदाजाने ८०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. यापूर्वी २०१६ मध्ये विराट कोहलीने ४ शतके आणि ७ अर्धशतकांच्या मदतीने ९७३ धावा केल्या होत्या. याच हंगामात सनरायझर्स हैदराबादकडून डेविड वॉर्नरने ९ अर्धशतकांच्या मदतीने ८४८ धावा केल्या होत्या. अशात अंतिम सामन्यात बटलरकडे वॉर्नरला मागे सोडण्याची संधी असेल. यासाठी बटलरला गुजरातविरुद्ध अंतिम सामन्यात फक्त २५ धावा कराव्या लागतील. मात्र विराटचा एका हंगामातील सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडणे त्याच्यासाठी केवळ अशक्य आहे.
महास्पोर्ट्सचा वॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
बेंगलोरला धूळ चारत हॉटेलवर पोहोचताच राजस्थानचे ‘रॉयल’ सेलिब्रेशन; Video Viral
बेंगलोरविरुद्ध जयस्वाल ठरला ‘यशस्वी’, मोहम्मद सिराजला पहिल्याच षटकात दिला चांगला चोप
एबी डिविलियर्सचा खरा वासरदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डेवाल्ड ब्रेविसच्या यशाची गोष्ट