ऍडीलेडच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये दुसरा कसोटी सामना सुरू आहे. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना गाबाच्या मैदानावर पार पडला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने ९ गडी राखून विजय मिळवला होता. यासह मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात इंग्लंड संघ जोरदार पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज जोस बटलर याने एक भन्नाट झेल टिपला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.
इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज जोस बटलर हा सर्वोत्तम यष्टीरक्षकांपैकी एक आहे. हे तो नेहमीच मैदानावर दाखवून देत असतो. जेव्हा त्याच्या हातात बॅट असते. त्यावेळी तो संघासाठी परिस्थितीनुसार धावा करत असतो. तसेच जेव्हा तो यष्टीमागे असतो. त्यावेळी डोळ्याची पापणी ही न हलता फलंदाजाला यष्टीचीत करणे आणि अविश्वसनीय झेल टिपण्याचे काम तो करत असतो. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात देखील यष्टीमागे त्याचा जलवा पाहायला मिळाला आहे.
तर झाले असे की, ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी ८ वे षटक टाकण्यासाठी स्टुअर्ट ब्रॉड गोलंदाजीला आला होता. षटकातील तिसरा चेंडू स्टुअर्ट ब्रॉडने शॉर्ट चेंडू टाकला, ज्यावर मार्कस हॅरीसने पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला.
परंतु, त्याचा अंदाज चुकला आणि चेंडू बॅटचा कडा घेत यष्टिरक्षक जोस बटलरकडे गेला. त्यावेळी जोस बटलरने उजव्या हाताला डाईव्ह मारत भन्नाट झेल टिपला. मार्कस हॅरिस अवघ्या ३ धावा करत माघारी परतला.
INSANE! Buttler pulls in an all-timer behind the stumps! #Ashes pic.twitter.com/v96UgK42ce
— cricket.com.au (@cricketcomau) December 16, 2021
दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी अशी आहे ऑस्ट्रेलिया संघाची प्लेइंग ११ –
मार्कस हॅरिस, डेविड वॉर्नर, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, कॅमरॉन ग्रीन, ॲलेक्स कॅरी (यष्टिरक्षक), मिचेल स्टार्क, नाथन लायन, मायकल नेसर, झाय रिचर्डसन
दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी अशी आहे इंग्लंड संघाची प्लेइंग ११ –
जो रूट (कर्णधार), जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्स, जोस बटलर (यष्टिरक्षक), हसीब हमीद, डेविड मलान, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, बेन स्टोक्स, ख्रिस वोक्स.
महत्वाच्या बातम्या :
आयपीएल मेगा लिलाव: मुंबईचे असणार ‘या’ तीन अनकॅप्ड खेळाडूंवर लक्ष; लावू शकतात कोट्यावधींची बोली
स्मृती लागली विश्वचषकाच्या तयारीला! व्यक्त केला विजयाचा निर्धार
कसोटीतून निवृत्ती स्वीकारण्याच्या वृत्तावर जडेजाने केले चार शब्दांचे ‘अर्थपूर्ण’ ट्विट