कुलवनडे विश्वचषक सुरू होण्याच्या एक दिवस आधी म्हणजेच बुधवारी (4 ऑक्टोबर) आयसीसी वनडे क्रमवारी घोषित केली गेली. या क्रमवारीत भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि शुबमन गिल यांच्या गुणांमध्ये घसरण दिसली आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचा दिग्गज डेव्हिड वॉर्मर आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम फायद्यात दिसत आहेत.
ताज्या आयसीसी वनडे क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड (Josh Hazlewood) आणि मोहम्मद सिराज यांनी गोलंदाजांच्या यादीत संयुक्तरित्या पहिला क्रमांक मिळवला आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी एकटा मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) या यादीत पहिल्या क्रमांकावर होता. ताज्या क्रमवारीत सिराजला 11 गुणांचे नुकसान झाले आहे. सध्या सिराज आणि हेजलवूड प्रत्येकी 669 गुणांसह वनडे गोलंदाजांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. त्याव्यतिरिक्त गोलंदाजांच्या यादीत कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याने पहिल्या 10 मधील आपेल स्थान गमावले. अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी सध्या 661 या यादीत 10व्या क्रमांकावर आहे. कुलदीप वनडे विश्वचषकादरम्यान आपले स्थान पुन्हा मिळवू शकतो. तसेच पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी याने 632 गुणांसह आठव्या क्रमांकावरून सहावा क्रमांक गाठला.
फलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नर (David Warner) याने 729 गुणांसह एका स्थानाची झेप घेत पचवा क्रमांक मिळवला आहे. तसेच बारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने मागच्या काही सामन्यांमध्ये केलेल्या अप्रतिम खेळीचा फायदा त्याला वनडे क्रमवारीत झाला आहे. रोहित 11व्या क्रमांकावर आता 10व्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारतीय संघाचा युवा सलामीवीर शुबमन गिल (Shubman Gill) आपला दुसरा क्रमांक टिकवून आहे. मात्र गिल ताज्या क्रमावारीत 9 गुणांचे नुकसान झाले आहेत. परिणामी पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या बाबर आझम आणि गिल यांच्यातील गुणांचे अंतर आता वाढले आहे.
संघांच्या क्रमवारीवर एक नजर टाकली, तर भारत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. भारताकडे 116 गुण आहेत, तर पाकिस्तान 115 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया (112), चौथ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका (106) आणि पाचव्या क्रमांकावर इंग्लंड (105) हे संघ आहेत.
महत्वाच्या बातम्या –
वर्ल्डकप खेळण्यासाठी कारकीर्द पणाला लावणार साउदी? दुखापतीचीविषयी महत्वाची अपडेट
अश्विनकडून धोनीची सिने दिग्दर्शकाशी तुलना, वनडे वर्ल्डकपपूर्वी फिरकीपटूने सांगितली खासियत