जगातील सर्वात मोठी व्यवसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव 23 डिसेंबर रोजी होणार आहे. या लिलावासाठी 405 खेळाडूंची अंतिम यादी जाहीर झालीये. त्यापैकी एक नाव आयर्लंडचा युवा वेगवान गोलंदाज जोशुआ लिटल याचे देखील आहे. मात्र, याच लिटल याने आता एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.
जोशुआ लिटल हा आयर्लंडचा प्रमुख वेगवान गोलंदाज मानला जातो. नुकत्याच झालेल्या टी20 विश्वचषकात त्याने हॅट्रिक देखील घेतली होती. हाच लिटल मागील वर्षी चेन्नई सुपर किंग संघाचा नेट बॉलर म्हणून आलेला. मात्र, त्याचवेळी आपला अपमान झाल्याचे लिटल याने म्हटले. एका मुलाखतीत बोलताना तो म्हणाला,
“पुढील आयपीएल लिलावात चेन्नई माझ्यासाठी बोली लावण्याची शक्यता कमी आहे. कारण, मी केवळ दोन आठवड्यात त्यांचा कॅम्प सोडून निघून आलो होतो. मला त्यांनी संघात सामील करताना असे म्हटले होते की, तू संघासोबत राहशील आणि कोणी दुखापतग्रस्त झाले तर तुला संधी मिळू शकते. मात्र, तेथील परिस्थिती वेगळीच होती. ते मला नेट बॉलर म्हणूनही केवळ दोन षटके टाकण्यासाठी देत. मला याची वेळोवेळी जाणीव होत होती की, मी इथे केवळ नेट बॉलर म्हणून आलो आहे. मी एक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होतो आणि वर्षभरात माझी कामगिरी चांगली झालेली. त्यामुळे मी लवकरच तो कॅम्प सोडण्याचा निर्णय घेतला.”
लिटल हा डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज असून, लंकन प्रीमियर लीग तसेच द हंड्रेड या मोठ्या लीगमध्ये देखील त्याने सहभाग नोंदवला आहे. आयपीएल 2023 लिलावात त्याच्यावर मोठी बोली लागू शकते.
(Joshua Little Reveal Why He Reveal CSK Camp In Two Weeks)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
BANvIND: ‘मॅचविनर’ कुलदीपला बाहेर केल्याने भडकले चाहते, कर्णधार राहुलची लावली क्लास
पहिल्या पुनित बालन-केदार जाधव मेगा क्लब चॅम्पियनशिप क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदु जिमखाना संघाला विजेतेपद