येत्या १८ ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. या सामन्यानंतर भारतीय संघाला इंग्लंड संघाविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. तसेच भारतीय महिला संघाला देखील जून-जुलैमध्ये क्रिकेटच्या तिन्ही प्रकारच्या मालिका इंग्लंड महिला संघाविरुद्ध खेळायच्या आहेत. त्यामुळे या दौऱ्यासाठी भारतीय महिला आणि पुरुष संघ गुरुवारी (३ जून) इंग्लंडला रवाना झाले आहेत. अशातच बीसीसीआयने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अक्षर पटेलने बीसीसीआयच्या पुढील नियोजनाबाबत भाष्य केले आहे.
भारतीय संघाने इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी मुंबईच्या एका हॉटेलमध्ये १४ दिवसांचा विलागिकरणाचा कालावधी पूर्ण केला आहे. त्यानंंतर भारतीय महिला आणि पुरुष संघ इंग्लंडला रवाना झाले. भारतीय संघांच्या मुंबई ते साऊथॅम्पटन दरम्यानच्या प्रवासाचा एक व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी खेळाडूंसोबत संवाद साधला आहे.
अक्षर पटेलने या व्हिडिओमध्ये म्हटले की, “मी तर मस्त झोप काढली. आता आम्हाला विलगिकरणात राहावे लागणार आहे. आम्हाला सांगण्यात आले आहे की, तीन दिवस आम्ही एकमेकांना भेटू शकणार नाही. तर आम्ही इतके दिवस आता विलागिकरणात राहणार आहोत.”
या दौऱ्यावर महिला संघाला एकमात्र कसोटी सामना, ३ टी -२० सामने आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे.
https://twitter.com/BCCI/status/1400680486851080199?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1400680486851080199%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fsports%2Fcricket-wtc-final-2021-indian-players-not-allowed-to-meet-each-other-for-three-days-in-southampton-3610113.html
असे आहे भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक
पुरुष संघ –
कसोटी अजिंक्यपद
१८ ते २२ जून – कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना (भारत विरुद्ध न्यूझीलंड), साऊथँम्पटन
कसोटी मालिका – इंग्लंड विरुद्ध भारत
४-८ ऑगस्ट – पहिला कसोटी सामना, नॉटिंगघम
१२-१६ ऑगस्ट – दुसरा कसोटी सामना, लॉर्ड्स
२५-२९ ऑगस्ट – तिसरा कसोटी सामना, हेडिंग्ले
२-६ सप्टेंबर – चौथा कसोटी सामना, लंडन
१०-१४ सप्टेंबर – पाचवा कसोटी सामना, मँटेस्टर
महिला संघ –
१६ – १९ जून – एकमेव कसोटी सामना, ब्रिस्टोल
२७ जून – पहिला वनडे सामना, ब्रिस्टोल
३० जून – दुसरा वनडे सामना, टॉन्टन
३ जुलै – तिसरा वनडे सामना, वॉरेस्टर
९ जुलै – पहिला टी२० सामना, नॉर्थॅम्प्टन
११ जुलै – दुसरा टी२० सामना, होव
१४ जुलै – तिसरा टी२० सामना, चेम्सफोर्ड
असा आहे इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय पुरुष संघ –
विराट कोहली(कर्णधार), अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केएल राहुल, वृद्धिमान साहा.
राखीव खेळाडू – अभिमन्यू इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्झान नागासवाला
इंग्लंड दौऱ्यातील कसोटी आणि वनडे मालिकेसाठीचा भारतीय महिला संघ – मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), स्मृती मंधाना, पूनम राऊत, प्रिया पुनिया, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, स्नेह राणा, तानिया भाटीया, इंद्राणी रॉय, झुलन गोस्वामी, शिखा पांडे, पूजा वस्त्रकार, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, एकता बिश्त, राधा यादव.
महत्त्वाच्या बातम्या –
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी ‘अशी’ असेल भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
रवी शास्त्रींच्या ‘या’ शब्दांमुळे वडिलांच्या निधनानंतरही मोहम्मद सिराजने केली उल्लेखनीय कामगिरी
धोनीने थेट स्कॉटलंडवरुन मागवला खास घोडा, किंमत पाहून तुम्हीही व्हाल थक्क