आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत आतापर्यंत न्यूझीलंड संघाने जबरदस्त कामगिरी केली आहे. रविवारी (१४ नोव्हेंबर) आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. न्यूझीलंड संघ पहिल्यांदाच आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला आहे. याच न्यूझीलंड संघाची या स्पर्धेतील कामगिरी जाणून घेऊया.
न्यूझीलंड संघ सध्या जोरदार फॉर्ममध्ये आहे. आधी आयसीसीच्या वनडे विश्वचषक त्यानंतर कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत न्यूझीलंड संघाचा बोलबाला राहिला आहे. आता या संघाने टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. २०१९ मध्ये झालेल्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड संघाला अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. तर २०२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाने भारतीय संघाला पराभूत करत जेतेपद मिळवले होते.
असा राहिला न्यूझीलंडचा टी२० विश्वचषक २०२१ मधील प्रवास
तसेच आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, न्यूझीलंड संघाला पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. पाकिस्तान संघाने न्यूझीलंड संघाला पराभूत केले होते. त्यानंतर पुढील सामन्यात न्यूझीलंड संघाने भारतीय संघाला ८ गडी राखून पराभूत करत जोरदार पुनरागमन केले होते. तसेच स्कॉटलॅंड आणि नामिबिया संघाला पराभूत करत न्यूझीलंड संघाने विजयाची हॅट्रिक केली होती.
पुढे उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी न्यूझीलंड संघाला अफगानिस्तान संघाला कुठल्याही परिस्थितीत पराभूत करायचे होते. या निर्णायक सामन्यात न्यूझीलंड संघाने अफगानिस्तान संघाला पराभूत केले आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला होता.
न्यूझीलंड आणि इंग्लंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील उपांत्य फेरीचा सामना पार पडला होता. या सामन्यात न्यूझीलंड संघाने २०१९ विश्वचषक स्पर्धेत झालेल्या पराभवाचा बदला घेत इंग्लंड संघाला धूळ चारली होती आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. आता अंतिम फेरीत न्यूझीलंड संघाचा सामना ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध होणार आहे.
न्यूझीलंडचा पहिल्यांदा टी२० विश्वचषक अंतिम सामन्यात प्रवेश
तसेच न्यूझीलंड संघाबद्दल बोलायचं झालं तर, न्यूझीलंड संघ पहिल्यांदाच आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला आहे. यापूर्वी न्यूझीलंड संघाने २००८ आणि २०१६ मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. न्यूझीलंड संघाने आतापर्यंत टी-२० विश्वचषक स्पर्धेत एकूण ३६ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये २० सामन्यात न्यूझीलंड संघाला विजय मिळवण्यात यश आले आहे. तर १४ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच २ सामने बरोबरीत सुटले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकात ‘असा’ राहिलाय ऑस्ट्रेलिया संघाचा प्रवास, एक वेळा तोंडून हिरावलाय जेतेपदाचा घास
कॉनवेच्या जिद्दीला सलाम! दुखापतग्रस्त असूनही संघाला चॅम्पियन बनवण्यात करतोय खेळाडूंची मदत- Video
करियरच्या अखेरच्या चेंडूवर विकेट घेणारे ५ गोलंदाज, ऍडम गिलख्रिस्टनेही केला आहे हा कारनामा