महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व मुंबई शहर कबड्डी असोसिएशन यांच्या सहकार्येने चिंचपोकळी सार्वजनिक उसत्व मंडळ आयोजित मोसमातील पहिली राज्यस्तरीय कुमार गट “चिंतामणी चषक” कबड्डी स्पर्धा आजपासून सद्गुरू भालचंद्र महाराज क्रीडांगण (लाल मैदान), गणेश टॉकीजच्या मागे, लालबाग, मुंबई-१२ येथे कबड्डीचा लाल मातीवरील खेळ रंगणार आहे.
राज्यस्तरीय कुमार गट कबड्डी स्पर्धा २०१९ (निमंत्रित संघ) दि ०९ जानेवारी ते १२ जानेवारी या कालावधीत होणार आहे. चिंचपोकळीचा चिंतामणी या नावाने ओळखला जाणारा चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळचा यंदा ९९ वे वर्ष आहे. दर वर्षी “चिंतामणी चषक” कबड्डी स्पर्धाच आयोजन केले जाते.
कबड्डी स्पर्धेत एकूण ०९ जिल्ह्यातील १८ संघ सहभागी होणार आहेत. १८ संघाचे ६ गटात विभाजन करून प्रथम दोन दिवस साखळी सामने खेळवण्यात येतील. त्यानंतर बादफेरीचे सामने खेळवण्यात येतील. मातीच्या २ मैदानावर सामने खेळवण्यात येणार असून सर्व सामने सायंकाळी ५ ते १० च्या दरम्यान होतील.
“चिंतामणी चषक” राज्यस्तरीय कुमार गट स्पर्धेची गटवारी
अ गट- दुर्गामाता स्पोर्ट्स क्लब मुंबई शहर, विकास क्रीडा मंडळ मुंबई शहर, श्री साई स्पोर्ट्स क्लब नाशिक
ब गट- गोल्फादेवी सेवा मंडळ मुंबई शहर, बंड्यामारुती सेवा मंडळ मुंबई शहर, जय बजरंग क्रीडा मंडळ रायगड
क गट- जय दत्तगुरु कबड्डी संघ मुंबई शहर, श्रीराम कबड्डी संघ पालघर, ग्राफिन जिमखाना ठाणे
ड गट- एस. एस. जी. फौंडेशन मुंबई शहर, ओम कल्याण ठाणे, वाघजाई क्रीडा मंडळ रत्नागिरी
इ गट- उत्कर्ष क्रीडा मंडळ पुणे, सिद्धीप्रभा फाउंडेशन मुंबई शहर, पार्ले स्पोर्ट्स क्लब मुंबई उपनगर
फ गट- सम्राट क्रीडा मंडळ सांगली, विजय बजरंग व्यायाम शाळा मुंबई शहर, स्फूर्ती क्रीडा मंडळ मुंबई उपनगर
महत्त्वाच्या बातम्या –
–घाटकोपर कबड्डी प्रीमियर लीग, जाणुन घ्या तिसऱ्या दिवसाचे निकाल
–पहा कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने घेतले आहे किती शिक्षण ?