---Advertisement---

झहीरबरोबर १५ दिवसांचा सराव या टीम इंडियाच्या सदस्यासाठी ठरला टर्निंग पाॅईंट

On: बुधवार, जानेवारी 16, 2019 6:56 PM
---Advertisement---

रणजी ट्रॉफीमध्ये बाद फेरीत जरी पंजाबला स्थान मिळाले नसले तरी त्यांचा वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौलने उत्तम कामगिरी केली आहे. रणजीमध्ये फिरकीपटू गोलंदाजांचेच वर्चस्व राहिले आहे. मात्र कौलने 6 सामन्यात 25.30च्या सरासरीने 23 विकेट्स पटकावल्या.

नुकतेच टाईम्स ऑफ इंडियाने घेतलेल्या मुलाखतीत कौलने त्याच्या कामगिरीचे श्रेय भारताचा माजी गोलंदाज झहिर खानला दिले आहे.

“एशिया कप दरम्यान रोहित शर्माने मला झहिरकडे जायचे सुचविले होते. त्यांच्या सोबत 15 दिवस मुंबईत राहुन मला खूप काही शिकायला मिळाले”, असे कौलने मुलाखतीत म्हटले आहे.

“झहिरने मला गोलंदाजी विषयी चांगले मार्गदर्शन केले. त्याचबरोबर आशिष नेहरानेही काही सुचना दिल्या”, असेही कौल म्हणाला आहे.

2008मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली जिंकलेल्या 19 वर्षाखालील विश्वचषकामध्ये कौलचा सहभाग होता. आयपीएल 2017मध्ये सनरायजर्स हैद्राबादकडून खेळताना त्याने 16 विकेट्स घेतल्या होत्या. यामुळे त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दौऱ्यासाठी इंडिया ए संघात जागा देण्यात आली.

न्यूझीलंडमध्येही इंडिया ए कडून खेळताना कौलने तीन सामन्यात सात विकेट्स घेतल्या होत्या.  यामुळेच त्याला न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय टी20 संघात जागा मिळाली आहे.

मागील वर्षाच्या आयपीएल हंगामातही कौलने उत्तम कामगिरी केली होती. यामुळे त्याला इंग्लंड दौऱ्यासाठी संघात जागा देण्यात आली होती.

कौलने भारताकडून 2 टी20 सामने खेळताना 3 विकेट्स घेतल्या आहेत. तर 58 प्रथम श्रेणीच्या सामन्यात 2.99च्या इकॉनॉमी रेटने 205 विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

मुंबई पोलिसांच्या ट्वीटरवरुन हार्दिक पंड्या-केएल राहुलला मिळाला धडा

दिग्गज लोकांना त्यांचे महत्त्व पटवून देण्याची गरज नसते- जसप्रीत बुमराह

जेव्हा कॅप्टन कूल एमएस धोनी खलील अहमदला वापरतो अपशब्द

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment