ऑस्ट्रेलिया पुरूष क्रिकेट संघाने नुकतेच घरच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध वनडे मालिका जिंकली. तीन सामन्यांची ही वनडे मालिका टी20 चॅम्पियन इंग्लंडने 3-0 अशी गमावली. यामधील पहिल्या आणि तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व पॅट कमिन्स याने केले. काही दिवसांपूर्वी त्याला वनडे संघाचा कर्णधार करण्यात आले आणि त्याने संघाला वनडे मालिका जिंकून देण्यात यश मिळवले. हे सर्व काही सुरळीत चालले असताना माजी प्रशिक्षकाने त्याच्यावर मोठा आरोप लावला आहे.
ऑस्ट्रेलियाचे माजी मुख्य प्रशिक्षक जस्टीन लॅंगर (Justin Langer) यांना 2022च्या सुरूवातीला आपले पद सोडावे लागेल. प्रशिक्षक पद गेल्याने त्यांनी बोर्डविरुद्ध वक्तव्य केले होते. आता त्यांनी पहिल्यांदाच खेळाडूंवर विवादास्पद विधाने करत थेट पॅट कमिन्स (Pat Cummins) याच्यावरच निशाना साधला आहे.
लॅंगर, खेळाडू आणि बोर्ड यांच्यात झालेल्या विवादामध्ये त्यांनी कमिन्सला भित्रा म्हटले आहे. लॅंगर इथेच थांबले नाही त्यांनी पुढे म्हटले, ‘माझ्यासमोर तर चांगला वागत होता, मात्र त्यांना जे बरोबर होते ते सर्व सांगितले नाही.’ माध्यमातील डेविड रिकिसियो यांनी म्हटले की, लॅंगर हे नेहमीच निपक्ष राहिले आहेत. ते ऑस्ट्रेलियाचे कर्णधार कमिन्स आणि ऍरॉन फिंच यांना धारेवर धरत आहे, कारण त्यांच्या मते त्यांचे प्रशिक्षक पद या दोघांमुळेच गेले.
रिकिसियो पुढे म्हणाले, “लॅंगर यांनी आरोप लावल्यापासून कमिन्स आणि फिंच यांच्याकडून काहीही उत्तर आलेले नाही. आता लॅंगर यांनी कमिन्सला भित्रा म्हटले असून खेळाडूही त्यांच्या प्रशिक्षणाविषयी बोलतात तर म्हणतात की ते कधीही इमानदार नव्हते.”
लॅंगर यांनी आपली भुमिका स्पष्ट करताना म्हटले, “माझ्या समोर खेळाडू चांगले वागत होते, मात्र आता वृत्तपत्रांमध्ये वेगळेच वाचायला मिळत आहे. काही लोक सूत्रानुसार असे लिहून काहीही छापतात. वर्तमानपत्रे काय लिहित आहेत यावर माझा विश्वास बसत नाही.”
ऑस्ट्रेलियाने लॅंगर यांच्या प्रशिक्षणादरम्यान टी20 विश्वचषक 2021 आणि ऍशेस मालिका 4-0 अशी जिंकली होती. यामुळे त्यांच्या कार्यकाळाचा कालावधी काही महिने आणखी वाढवला जाणार होता, मात्र खेळाडूंनी त्यावर नाराजी दर्शवली. यामुळे त्यांनी कार्यकाळ संपण्याअगोदरच प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला. Justin Langer attacked Pat Cummins & Aaron Finch, saying, ‘He’s a coward and behaved differently in front of me
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराट कोहलीवर आली भांडी घासण्याची वेळ, फोटो होतोय भलताच व्हायरल
वेंकटेश अय्यरचा खुलासा; म्हणाला, ‘त्यामुळे रोहित शर्मा गोलंदाजीची संधी देत नाही’