काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघा (Australia Cricket Team) ने इंग्लंडला ४-० ने पराभूत करत ऍशेस मालिका (Ashes Series) जिंकली होती. कर्णधार पॅट कमिन्स आणि मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगर (Justin Langer) यांच्या मार्गदर्शनाखाली ऑस्ट्रेलिया संघाने ही प्रतिष्ठित मालिका जिंकली होती. यानंतर आता ऑस्ट्रेलिया संघाचे मुख्य प्रशिक्षक (Australia Head Coach) जस्टीन लँगर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला (Langer Resigned As Head Coach) आहे. तत्काळ प्रभावाने आपण हे पद सोडत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
लँगर यांच्या प्रशिक्षणाखाली ऑस्ट्रेलिया संघाने केवळ ऍशेस मालिकाच नव्हे तर २०२१ चा टी२० विश्वचषकही पटकावला होता. ते ४ वर्षे ऑस्ट्रेलिया संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कार्यरत होते.
शुक्रवारी (०४ फेब्रुवारी) क्रिकेट ऑस्ट्रेलिया बोर्डासोबत झालेल्या बैठकीनंतर लँगरने हा निर्णय घेतला आहे. मेलबर्नमध्ये दिवसभर चाललेल्या या बैठकीनंतर सीईओ निक हॉक्ले यांनी सांगितले की, प्रशिक्षक लँगर यांच्यासमवेत गोपनीय चर्चा करूनही कोणते समाधान नाही झाले. या बैठकीच्या १८ तासांनंतरच लँगरने राजीनाम्याची पुष्टी केली आहे.
Developing story here with Justin Langer stepping down as coach. https://t.co/IBbUuXMLkM
— cricket.com.au (@cricketcomau) February 5, 2022
५१ वर्षीय लँगर यांच्या व्यवस्थापन कंपनी डीएसईजीने शनिवारी सकाळी (०५ फेब्रुवारी) राजीनाम्यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. कंपनीने घोषणा करताना म्हटले आहे की, डीएसईजी या गोष्टीची पुष्टी करत आहे की, आमचे क्लायंट जस्टीन लँगर यांनी आज सकाळी ऑस्ट्रेलियाच्या पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा त्यांनी काल संध्याकाळी क्रिकेट ऑस्ट्रेलियासोबत झालेल्या बैठकीनंतर दिला आहे. प्रशिक्षकाने तत्काळ प्रभावाने राजीनामा दिला आहे.
DSEG confirms that our
client Justin Langer has this morning tendered his resignation as coach of the Australian mens cricket team.
The resignation follows a meeting with Cricket Australia last evening. The resignation is effective immediately.— DSEG (@DSEGWorldwide) February 5, 2022
एकीकडे लँगर यांनी ऑस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षकपद सोडले आहे, दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघाला ३ आठवड्यांनंतर पाकिस्तानच्या दौऱ्यावर जायचे आहे. त्यामुळे अशी अपेक्षा केली जात आहे की, या दौऱ्यात प्रशिक्षक लँगर यांच्या अनुपस्थितीत साहाय्यक प्रशिक्षक अँड्र्यू मैक्डॉनाल्ड संघाचे प्रशिक्षकपद सांभाळतील. कारण ऑस्ट्रेलिया संघाने फार पूर्वीच योजना आखून ठेवली आहे की, ते श्रीलंकाविरुद्ध होणाऱ्या आगामी ५ सामन्यांच्या टी२० मालिकेमध्ये मैक्डॉनाल्डला ही जबाबदारी देणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
हिवाळी ऑलिम्पिकची जोरदार सुरुवात, उद्घाटन सोहळ्यात तिरंगा घेऊन उतरला ‘काश्मिरी बॉय’
आयपीएलचा पहिला लिलाव गाजवणारे ‘ते’ तिघे भारतीय सध्या करतात काय? घ्या जाणून