---Advertisement---

“मी ८० वर्षाचा म्हातारा….”, लँगर यांच्या पत्राला ब्रॅडमन यांनी दिले होते मजेशीर उत्तर

On: बुधवार, नोव्हेंबर 18, 2020 10:53 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी एका मुलाखतीत आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळातील काही घटनांना उजाळा दिला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असताना आपल्याला आलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपण सर डॉन ब्रॅडमन यांना पत्र लिहल्याची कबुली त्यांनी दिली. आपल्या प्रश्नांना ब्रॅडमन यांनी मजेशीर उत्तर दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

डॉन ब्रॅडमन यांची मागितली होती मदत

ऑस्ट्रेलियाच्या ९० च्या दशकातील संघाचे मुख्य सदस्य राहिलेल्या लँगर यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले, “मला वेगवान गोलंदाजांसमोर फलंदाजी करताना असहजता होत होती. त्यावेळी मी सर डॉन ब्रॅडमन यांना पत्र लिहिले होते.”

पत्राविषयी खुलासा करताना लँगर म्हणाले, “मी प्रामुख्याने बॅकफुटचा फलंदाज आहे. त्यामुळे, वेगवान गोलंदाजांविरूद्ध प्राविण्याने खेळण्यासाठी मी काय करावे ? अशा आशयाचे हे पत्र होते.”

ब्रॅडमन यांनी दिले होते मजेशीर उत्तर

लँगर यांच्या पत्राला ब्रॅडमन यांनी उत्तर देताना लिहले, “अरे, मी ८० वर्षाचा म्हातारा आहे. मी तुझी काय मदत करणार? मी माझ्या काळात काही विशेष करत नव्हतो. मी आतापर्यंत एक साधारण आयुष्य जगलो आहे आणि कधीही व्यसन केले नाही.”

तंत्रशुद्ध फलंदाजीचे दिले कानमंत्र

ब्रॅडमन यांनी उत्तरात पुढे लिहिले होते, “वेगवान गोलंदाजांविरुद्ध खेळताना येणाऱ्या समस्येविषयी सांगायचे झाले तर, त्यासाठी काही लहान लहान क्लूप्त्या आहेत. मी वेगवान गोलंदाजांविरूद्ध खेळताना काहीसा मागे आणि तिरका उभा रहायचो. बॅकफूटवर खेळताना, इतर फलंदाजांच्या मानाने फटके खेळण्यास स्वतंत्रता मिळते.”

ब्रॅडमन यांच्या उत्तराविषयी सांगताना लँगर म्हणाले, “ब्रॅडमन यांनी तंत्रासोबतच आयुष्याचे ही काही मूलमंत्र मला सांगितले होते. ते कायम खेळाचा आनंद घेत राहिले. त्यांचे पत्र आजही माझ्या स्टडी रूमची शोभा वाढवते. जेव्हा मी घरी जातो तेव्हा ते पत्र तासनतास पाहत असतो.”

लँगर सध्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे प्रशिक्षक आहेत. २०१८ च्या बॉल टेम्परिंग प्रकरणानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटला पूर्वपदावर आणण्यात लँगर यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Video -‘गेलचे अजूनही आरसीबीवर प्रेम!’ वडीलांनी आरसीबीची कॅप घातल्याने चाहत्यांच्या भावूक प्रतिक्रिया

वासिम जाफरने केले मीम शेअर; बिग बॅशमधील नियमांची उडवली खिल्ली

“सात समुंदर पार मै तेरे…” भारतीय संघाच्या कॅम्पमध्ये वाजले गाणे आणि धवन, शॉचे थिरकले पाय

ट्रेंडिंग लेख –

…अन् धोनीचा सध्या विरोधक झालेल्या खेळाडूलाही धोनीचा ‘रनर’ म्हणून यावे लागले मैदानात

हे तीन परदेशी खेळाडू पुढील आयपीएलमध्ये दिसण्याची शक्यता कमी; दोन माजी कर्णधारांचा समावेश

पॉटींगच्या गोलंदाजी विभागाचा ‘सरसेनापती’ राहिलेल्या ब्रेट लीची अनोखी कहानी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---