पुणे पलानी टास्कर्स विरुद्ध सांगली सिंध सोनिक्स झालेल्या सामन्यांत जोरदार टक्कर बघायला मिळाली. मध्यंतराला शेवटची तीन मिनिटं शिल्लक असताना 10-10 असा सामना बरोबरीत सुरू होता. त्यानंतर आर्यन राठोड व कृष्णा शिंदे सलग चढाया करत सांगली संघावर लोन पडला.
मध्यंतरानंतर 18-10 असा सामना सुरु झाला. सांगलीच्या वृषभ साळुंखे चढाईत गुण मिळवत तर प्रदीप मानेने पकड करत संघाची पिझाडी कमी केली. वृषभ साळुंखे व संग्राम जाधव ने चपळ चढाया करत पुणे संघावर लोन पडला. शेवटची सहा मिनिट शिल्लक असताना पुणे संघाकडे नाममात्र 1 गुणांची आघाडी होती.
शेवटच्या सेकंदापर्यत उत्कंठा लागून राहिलेला हा सामना अखेर 26-26 असा बरोबरीत सुटला. के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज मधला पहिला सामना बरोबरीत राहिला. सांगलीच्या वृषभ साळुंखेच्या सुपर टेन ने सामना चांगला रंगला. पुणे कडून आर्यान राठोड ने चढाईत 8 गुण मिळवले तर त्याला कृष्णा शिंदेने चांगली साथ दिली. ऋषिकेश पाटीलने 5 पकडी करत बचावफळी सांभाळली.
बेस्ट रेडर- वृषभ साळुंखे, सांगली सिंध सोनिक्स
बेस्ट डिफेंडर- ऋषिकेश पाटील, पुणे पलानी टास्कर्स
कबड्डी का कमाल- वृषभ साळुंखे, सांगली सिंध सोनिक्स
(K. M. P. Yuva Kabaddi Series. Pune vs Sangli match ended in a draw)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अहमदनगर पेरियार पँथर्स संघाची विजयी हट्रिक
KMP युवा कबड्डी सिरीज – अहमदनगर पेरियार पँथर्स संघाचा सलग दुसरा विजय.