संयुक्त अरब अमिरातीत पार पडलेल्या आयपीएल २०२० च्या हंगामात आपल्या वेगवान गोलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्स संघाला अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या कागिसो रबाडा याने आयपीएलच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध राहणार नसल्याची माहिती दिली आहे. याचा फटका दिल्ली संघाला बसू शकतो.
येत्या एप्रिल महिन्यात आयपीएल २०२१ स्पर्धेचे आयोजन करण्यात येण्याची शक्यता आहे. परंतु ही स्पर्धा नक्की कुठे होणार? यावर अजुनही प्रश्नचिन्ह आहे. अशातच दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने एप्रिल महिन्यात पाकिस्तानविरुद्ध मर्यादित षटकांच्या (४ टी-२० सामने, ३ एकदिवसीय सामने) मालिकेची घोषणा केली आहे. यामुळे दक्षिण आफ्रिका संघाचे खेळाडू आयपीएलच्या पहिल्या आठवड्यासाठी उपलब्ध नसतील.
देश आधी, फ्रँचायझी नंतर
आयपीएल २०२० च्या हंगामात १७ सामन्यात ३० गडी बाद करत पर्पल कॅपचा मानकरी ठरलेल्या रबाडाने दक्षिण आफ्रिकन वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत याविषयी माहिती दिली आहे. त्याने म्हटले की, “माझ्यासाठी देश सर्वात आधी येतो. त्यामुळे असे होऊ शकते की, मी आयपीएलच्या पहिल्या आठवड्यात खेळण्यासाठी उपलब्ध नसेल. जर पाकिस्तानविरुध्द सुरू होणारी मालिका त्याचवेळी सुरू होत असेल, तर मी कदाचित नसेल. तसे दिल्ली माझे भारतातील दुसरे घर आहे. परंतु देशासाठी खेळणे ही माझ्यासाठी प्राथमिक गोष्ट आहे.”
रबाडाच्या जागी यादवला मिळू शकते संधी
दिल्ली कॅपिटल्स संघाने आयपीएल २०२१ साठी बऱ्याच वेगवान गोलंदाजांना आपल्या संघात सामाविष्ट केले आहे. दिल्ली संघाने उमेश यादवला आपल्या संघात विकत घेतले आहे. याव्यतिरिक्त, टॉम करन, एन्रिच नॉर्किए, इशांत शर्मा, हर्षल पटेल, ख्रिस वोक्स, डेनियल सॅम्स, लुकमान मैरीवाला यांसारखे गोलंदाज देखील रबाडाचा पर्याय ठरू शकतात. परंतु यादवचा अनुभवी लक्षात घेता, त्याला प्राधान्य देण्याची शक्यता जास्त आहे.
असा आहे आयपीएल २०२१ साठी दिल्लीचा संघ-
लिलावाआधी संघात कायम असलेले खेळाडू –
श्रेयस अय्यर (कर्णधार), अजिंक्य रहाणे, अमित मिश्रा, आवेश खान, अक्षर पटेल, इशांत शर्मा, कागिसो रबाडा, पृथ्वी शॉ, आर अश्विन, रिषभ पंत, शिखर धवन, ललित यादव, मार्कस स्टॉयनिस, शिमरॉन हेटमायर, डॅनियल्स सॅम्स , एन्रिच नॉर्किए, ख्रिस वोक्स, प्रविण दुबे.
लिलावात खरेदी केलेले खेळाडू –
टॉम करन(५.२५ कोटी), स्टिवन स्मिथ(२.२० कोटी), सॅम बिलिंग्ज(२ कोटी), उमेश यादव(१ कोटी), रिपाल पटेल(२० लाख), विष्णू विनोद(२० लाख), लुकमन हुसेन मेरिवाला(२० लाख), एम सिद्धार्थ(२० लाख)
महत्त्वाच्या बातम्या-