इंडियन प्रीमियर लीग 2020 मधील दुसरा क्वालिफायर सामना रविवारी (8 नोव्हेंबर) दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 189 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल दिल्लीची सुरुवात खराब झाली.दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर सलामीवीर डेविड वॉर्नर बाद झाला.त्याला दिल्लीचा वेगवान गोलंदाज रबाडाने बाद केले. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
दिल्लीने दिलेल्या 190 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या हैदराबादने पहिल्याच षटकांत 12 धावा कूटल्या. दुसऱ्या षटकांत दिल्लीचा वेगवान गोलंदाज रबाडा गोलंदाजी करायला आला. त्यावेळी डेविड वॉर्नर खेळपट्टीवर फलंदाजी करत होता. रबाडाने पहिलाच चेंडू फुल लेंथचा फेकला. चेंडू स्विंग झाला झाला. वॉर्नरने त्या चेंडूवर फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू त्याच्या पायाला लागून तो त्रिफळाचित झाला.
Did You Watch – Warner b Rabada
Full length delivery, but the ball swings just a wee bit to brush Warner's pads and hit the stumps. Superb breakthrough for #DelhiCapitals courtesy @KagisoRabada25 .
📹📹https://t.co/8garNrSTWn #Dream11IPL #Qualifier2
— IndianPremierLeague (@IPL) November 8, 2020
धवन, हेटमायर यांच्या खेळीमुळे दिल्लीने केल्या 189 धावा
दिल्लीकडून सलामीवीर शिखर धवनने सर्वाधिक 78 धावा केल्या.यामध्ये 5 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. त्याचवेळी युवा फलंदाज हेटमायरने डावाच्या अखेरच्या काही षटकांत 42 धावांची आक्रमक खेळी केली. या फलंदाजांच्या खेळीच्या जोरावर दिल्लीला 189 धावा करता आल्या.
हैदराबादचा झाला पराभव
प्रत्युत्तरादाखल हैदराबादची सुरुवात खराब झाली. कर्णधार डेविड वॉर्नर फक्त 2 धावा करून तंबूत परतला. या संघांने अवघ्या 44 धावांवर 3 बळी गमावले होते. अनुभवी फलंदाज केन विल्यमसन ने 45 चेंडूत 67 धावांची उत्कृष्ट खेळी केली. युवा फलंदाज अब्दुल समदने (16 चेंडू, 33 धावा) त्याला उत्तम साथ दिली. मात्र सामना जिंकवून देण्यात ते अपयशी ठरले. संघाला 20 षटकांत केवळ 172 धावाच करता आल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
AUSvIND: ठरलं! ‘या’ दिवसापासून टीम इंडिया सिडनीत करणार सरावाला सुरुवात
हैदराबादच्या गोलंदाजांवर तुटून पडला शिखर धवन; नावावर केले ३ खास विक्रम
पर्पल कॅप पटकावणाऱ्या रबाडाच्या खात्यात मोठ्या विक्रमाची नोंद, भल्या भल्यांवर ठरला वरचढ