ईशान किशन सध्या चर्चेत आहे. भारताच्या यष्टीरक्षक फलंदाजाने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटी मालिकेतून आपले नाव मागे घेतल्याने तो चर्चेत आला होता. वास्तविक, ईशानने मानसिक थकव्याचे कारण देत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून आपले नाव मागे घेतले होते, त्यावर आता पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक कामरान अकमल याने मोठे वक्तव्य केले आहे. इशानचे हे निमित्त समजण्याच्या पलीकडे असल्याचे अकमलने म्हटले आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घेणाऱ्या इशान किशन ( Ishan Kishan) याची अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी किंवा इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी निवड झाली नाही. भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी केएस भरत (Ks Bharat) आणि ध्रुव जुरेल (Dhruv Jurel) यांची यष्टिरक्षक म्हणून निवड केली आहे. (kamran akmal reacted on ishan kishan due to mental fatigue)
कामरान अकमल ( Kamran Akmal) याने त्याच्या यूट्यूब चॅनलवर ईशान किशनच्या मानसिक थकव्याबद्दल सांगितले. तो म्हणाला, “मानसिक थकव्यामुळे ईशान किशनला दक्षिण आफ्रिकेतील कसोटी संघातून वगळण्यात आल्याची बातमी आहे. करिअरच्या या सुरुवातीच्या टप्प्यात तुम्हाला कोणता मानसिक थकवा येऊ शकतो? संघात रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह सारखे लोक या थकव्याचा सामना करतात. ते आयपीएल आणि कसोटीसह आंतरराष्ट्रीय सामने खेळतात. यामुळे, खेळाडूंनी ब्रेक घेतल्याचे आम्ही कधी ऐकले नाही.”
पाकिस्तानचा माजी यष्टिरक्षक फलंदाज पुढे म्हणाला, “तुम्ही आयपीएलच्या 2 महिन्यांसाठी स्वत:ला तयार करत आहात. भारतीय संघात खेळणे ही मोठी गोष्ट आहे आणि हे कारण माझ्या समजण्यापलीकडचे आहे. मला वाटते की, निवड समितीने इशानला या संघातून काढून टाकले आहे. तुम्ही त्याला बाहेर काढून खूप चांगले काम केले. आता त्याला विश्रांती द्या आणि देशांतर्गत क्रिकेट खेळू द्या. हा खेळाडूंना संदेश असावा की, मानसिक थकव्यामुळे त्यांना हवे तेव्हा विश्रांती घेता येत नाही. हे राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि तुम्ही अशा प्रकारे विश्रांती घेऊ शकत नाही.” (The reaction about Ishaan Kishanla came directly from across the border the former Pakistani legend made a big statement)
हेही वाचा
विराटने नोव्हाक जोकोविचची केली स्तुती, आता दिग्गज टेनिसपटूने दिले असे उत्तर
‘तू एक मजबूत, शक्तिशाली महिला आहेस’, चहलने पत्नी धनश्रीचे कौतुक करत शेअर केला खास फोटो





