पाकिस्तान क्रिकेट बोर्डला (पीसीबी) सध्या अनेक अडचणींचा सामना करत आहे. एकीकडे आगामी 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी पाहता ठोस व्यवस्था करण्याची जबाबदारी पीसीबीच्या खांद्यावर आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानचे अनेक माजी क्रिकेटपटू संघाच्या खराब कामगिरीसाठी बोर्डावर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. दरम्यान पाकिस्तानचा माजी यष्टिरक्षक-फलंदाज कामरान अकमलचे मागील दिवसातील काही व्हिडिओ समोर आले आहेत. ज्यात त्याने आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे पीसीबीला ठणकावले आहे आणि त्याच्या टीमची भारतीय संघाशी तुलना करून पीसीबीवर निशाणा साधला आहे.
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये कामरान अकमल पीसीबीला परिस्थितीनुसार योग्य पद्धतीने संघ निवडण्याचा सल्ला देताना दिसत आहे. कामरानच्या मते, पीसीबीकडे बैठका घेण्यासाठी वेळ आहे, पण खेळावर लक्ष केंद्रित करण्यासाठी वेळ नाही. बांग्लादेशविरुद्ध चेन्नई कसोटी सामन्यात भारताच्या नेत्रदीपक विजयाचा उल्लेख करत त्याने टीम इंडियाचे कौतुकही केले आहे.
कामरान म्हणाला, “पीसीबीला संघाची निवड योग्य पद्धतीने करता येत नाही. शिवाय त्यांचा गेम प्लॅनही शून्य आहे. पीसीबीला खेळाडूंची निवड आणि जागतिक क्रिकेटमध्ये कसे वर्चस्व कसे निर्माण करायचे, यासह बीसीसीआयकडून बरेच काही शिकण्याची गरज आहे.
Kamran Akmal said “PCB should learn from BCCI, their professionalism, their team, selector, captain & coaches – These are the things that make a team number one & dominate the world. [Kamran Akmal YT] pic.twitter.com/NV1g745IUS
— Johns. (@CricCrazyJohns) September 24, 2024
भारताविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेपूर्वी बांग्लादेशचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर होता. यादरम्यान बांग्लादेशने पाकिस्तानचा व्हाईटवॉश करत मालिका 2-0 ने जिंकली होती. पाकिस्तानच्या घरच्या मैदानावर झालेल्या दारूण पराभवानंतर पीसीबी आणि संघावर जोरदार टीका होत आहे. यावेळी, कामरान अकमल व्यतिरिक्त, दानिश कनेरिया आणि बासित अली यांच्यासह अनेक माजी पाकिस्तानी क्रिकेटर वेळोवेळी पीसीबीच्या व्यवस्थापनाला दोष देताना दिसत आहेत.
हेही वाचा-
आयसीसीची मोठी घोषणा; पहिल्यांदाच टी20 विश्वचषकसाठी, महिला अंपायर आणि मॅच रेफरी
14 चौकार, 5 षटकार; ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाशिकच्या साहिल पारखची झंझावाती शतकी खेळी
‘मी त्याच्यासारखा कर्णधार..’, आकाश दीपचे रोहित शर्माबाबत लक्षवेधी वक्तव्य!