पाकिस्तानचा अनुभवी यष्टीरक्षक कामरान अकमल हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय नसला तरी सोशल मीडियावर नेहमी व्यस्त असतो. काही कारणांमुळे चाहते त्याला ट्रोलदेखील करत असतात. पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी (१४ ऑगस्ट) त्याने केलेल्या एका चुकीमुळे तो पुन्हा एकदा चाहत्यांच्या निशाण्यावर आला असून, सोशल मीडियावर चाहते त्याच्या इंग्लिश भाषेची खिल्ली उडवत आहेत.
अकमलने केली ही चूक
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी म्हणजे १४ ऑगस्ट रोजी पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो. या स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानमधील सेलिब्रिटी व जनता एकमेकांना शुभेच्छा देत असतात. या महत्त्वपूर्ण दिवशी कामरान अकमलने आपल्या ट्विटर हँडलवरून देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, INDEPENDENCE असे लिहिण्याऐवजी त्याने INDEPENCE असे लिहिले. त्यावरून अनेक चाहत्यांनी मजेदार प्रतिक्रिया दिल्या.
https://twitter.com/KamiAkmal23/status/1426256477090635776?s=19
चाहत्यांच्या आल्या अशा प्रतिक्रिया
अकमलच्या या छोट्याशा चुकीमुळे चाहत्यांनी त्याला पुन्हा एकदा धारेवर धरत मजा घ्यायला सुरुवात केली. एका चाहत्याने मीम शेअर करत लिहिले, ‘अजून तर आपल्याला आणखी बेइज्जत व्हायचे आहे’
Kamran Akmal didn't deleted this tweet yet because: pic.twitter.com/R5GtiLeRT5
— IronicOracle (@1heManyFacedGod) August 13, 2021
दुसऱ्या एका चाहत्याने ट्विट करताना लिहिले, ‘यासाठी योग्य शिक्षण घेणे गरजेचे असते.’
That's why proper education is necessary…
Legend for a reason 🤣🤣🤣🤣🤣🤣…
Moral- one should not bunk English classes….Inhe kashmir chahia 🤣🤣🤣🤣🤣#kamranakmal pic.twitter.com/eCBYsLS465
— Harsh Singh (@HarshSi33500612) August 14, 2021
#14August #kamranakmal and his brother #Umarakmal is getting best day by day at their legacy…😄😄😄😄#pakistan pic.twitter.com/WynKzS5rgn
— Himanshu Dubey🇮🇳 (@hemudubey10) August 14, 2021
अन्य एका चाहत्याने ट्रोल करत म्हटले, ‘कामरान त्याचा भाऊ दिवसेंदिवस आणखी चांगले होत आहेत.’ कामरान अकमल याचा भाऊ उमर अकमल हा देखील अनेक वेळा सोशल मीडियावर अशाच प्रकारच्या इंग्रजी भाषेच्या चुका केल्यामुळे ट्रोल होत असतो.
पाकिस्तान संघाबाहेर आहे कामरान
पाकिस्तानमधील सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक असलेला कामरान अकमल २०१७ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नाही. मात्र, पाकिस्तान सुपर लीग व देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो खेळताना दिसतो. २००२ ते २०१७ असे जवळपास पंधरा वर्षे त्याने पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. पाकिस्तानने जिंकलेल्या २००९ टी२० विश्वचषक संघाचा तो प्रमुख खेळाडू होता.
महत्त्वाच्या बातम्या-
शतकांच्या शतकाचं इंजिन आज जोडलं गेलं होतं, याचदिवशी सचिनने केलं होतं पहिलं आंतरराष्ट्रीय शतक
…आणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली
वेगवान खेळपट्टीवरही कर्णधाराला फिरकीपटू जडेजाला का द्यावी लागली गोलंदाजी? कारण आहे खूप मोठं