सिडनी। ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज केन रिचर्डसनचे कोरोना व्हायरसचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्याला असणारा कोरोना व्हायरसचा धोका टळला आहे.
रिचर्डसनने काल त्याचा घसा दुखत असल्याची तक्रार केली होती. त्यामुळे त्याची कोरोना व्हायरसची तपासणी करण्यात आली होती. याचमुळे त्याला आज (१३ मार्च) ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड संघात झालेला पहिला वनडे सामनाही खेळता आला नाही.

त्याने काल घसा दुखत असल्याचे सांगितल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वैद्यकीय पथकाने त्याला संघातील इतर खेळाडूंपासून लांब ठेवले होते. तसेच खबरदारी म्हणून त्याची तपासणी केली होती. पण आता त्याच्या रिपोर्टमध्ये त्याला कोरोना व्हायरसचा धोका नसल्याचे लक्षात आल्याने तो पुन्हा संघात सामील झाला आहे.
https://twitter.com/cricketcomau/status/1238396195606650885
आजपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड संघात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु झाली आहे. ही मालिका कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेता सध्या प्रेक्षकांच्या अनुपस्थिती खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला ७१ धावांनी पराभूत केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–बीसीसीआयचा मोठा निर्णय; आयपीएल २०२० ला स्थगिती
–संपुर्ण यादी: आजपर्यंतचे सर्व रणजी ट्राॅफी विजेेते व उपविजेते
–कोरोना व्हायरसचा फुटबॉलला मोठा फटका; या स्पर्धांवर झाला परिणाम






