न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना क्राइस्टचर्चच्या हॅगली ओव्हलवर खेळवला जात आहे. 28 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने पहिल्या दिवशी फलंदाजी करत दिवसाचा खेळ संपेपर्यंत 8 विकेट्स गमावून 319 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा पहिला डाव 348 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात इंग्लंडची फलंदाजी उत्कृष्ट झाली. हॅरी ब्रूकच्या 171 धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर इंग्लिश संघाने पलटवार करत 499 धावा केल्या. तर ब्रूकशिवाय ऑली पोपने 77 आणि बेन स्टोक्सने 80 धावांचे योगदान दिले.
तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावाची सुरुवात खूपच खराब झाली. अवघ्या 23 धावांत संघाने दोन्ही सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या. यानंतर केन विल्यमसन आणि रचिन रवींद्र यांनी आघाडी घेत चहापानाच्या वेळेपर्यंत संघाची धावसंख्या 62-2 पर्यंत नेली. यादरम्यान न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विल्यमसनने नवा इतिहास रचला.
पहिल्या डावात 93 धावांची शानदार खेळी करणाऱ्या केन विल्यमसनने न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात आपली 26वी धावा पूर्ण करताच कसोटीत 9000 धावा पूर्ण केल्या. यासह विल्यमसन 9000 कसोटी धावा करणारा न्यूझीलंडचा पहिला फलंदाज ठरला. याआधी एकाही किवी फलंदाजाला हा आकडा स्पर्श करता आला नव्हता. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 9 हजार किंवा त्याहून अधिक धावा करणारा केन हा जगातील 19वा फलंदाज ठरला आहे.
🚨 HISTORY BY KANE WILLIAMSON 🚨
– Williamson becomes the first New Zealand cricketer to complete 9000 runs in Tests 🫡 pic.twitter.com/Mj7xnOc2a9
— Johns. (@CricCrazyJohns) November 30, 2024
केन विल्यमसनने आपल्या 103व्या कसोटी सामन्यात हा ऐतिहासिक टप्पा गाठला. त्याने 182 व्या डावात 9000 धावा पूर्ण केल्या. अशाप्रकारे तो कसोटीत जलद 9000 धावा पूर्ण करणारा 5वा फलंदाज ठरला. केनच्या आधी स्टीव्ह स्मिथ, ब्रायन लारा, कुमार संगकारा आणि युनूस खान यांनी जलद 9000 धावा पूर्ण करण्याचा मोठा पराक्रम केला होता.
सर्वात जलद 9000 कसोटी धावा (सामन्यांनुसार)
99 – स्टीव्ह स्मिथ
101 – ब्रायन लारा
103 – कुमार संगकारा
103 – युनूस खान
103 – केन विल्यमसन
हेही वाचा-
इशान किशनची 334.78 च्या स्ट्राईक रेटने ऐतिहासिक खेळी, झारखंडचा विश्वविक्रम!
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी; दुखापतीतून परताणारा मोहम्मद शमी पुन्हा जखमी!
आयसीसीचा पाकिस्तानला अल्टिमेटम! चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हायब्रीड मॉडेल स्वीकारा, नाहीतर….