कराची येथे पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान वर्षातील अखेरचा कसोटी सामना खेळला जात आहे. फलंदाजांसाठी पोषक असलेल्या या खेळपट्टीवर तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडने वर्चस्व गाजवत नाममात्र आघाडी मिळवली. न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विलियम्सन याने झळकावलेले नाबाद शतक तिसऱ्या दिवसाचे वैशिष्ट्य राहिले. याच शतकासह तो भारतीय उपखंडात एक अद्वितीय कामगिरी करणारा एकमेव फलंदाज बनला.
कर्णधारपद सोडल्यानंतर आपला पहिलाच सामना खेळत असलेल्या केन विलियम्सन याची सुरुवात या डावात आश्वासक नव्हती. त्याला 21 धावांवर यष्टिचितच्या रूपाने सोपे जीवदान मिळाले. या जीवनाचा फायदा त्याने घेतला. दिवसाखेर टिच्चून फलंदाजी करताना त्याने आपले 25 वे शतक पूर्ण केले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडच्या 6 बाद 440 धावा झालेल्या. विलियम्सन नाबाद 105 धावांवर मैदानात उभा होता.
केन विलियम्सन याने आपले हे शतक तब्बल 722 दिवसानंतर पूर्ण केले आहे. या शतकासह क्रिकेटच्या 145 वर्षांच्या इतिहासात भारतीय उपखंडातील सर्व देशांमध्ये शतक झळकावणारा पहिला इतर देशातील फलंदाज बनला. केनने याआधी भारत, श्रीलंका व बांगलादेशमध्ये शतक झळकावले होते.
केनने या चारही देशांमध्ये शतक झळकावले असले तरी त्याची एकूण कामगिरी तितकी प्रभावी नाही. भारतामध्ये त्याने केवळ 33 तर श्रीलंकेमध्ये फक्त 26 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. बांगलादेशमध्ये मात्र तो चांगलाच यशस्वी ठरला आहे. बांगलादेशमध्ये त्याच्या बॅटमधून 83 च्या सरासरीने धावा निघाल्या होत्या.
या सामन्याचा विचार केल्यास पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 438 धावा केल्या. त्याच्या प्रतिउत्तरात टॉम लॅथम व केन विलियम्सन यांनी शतके ठोकत तिसऱ्या दिवसाखेर न्यूझीलंडने दोन धावांची आघाडी मिळवली आहे.
(Kane Williamson Hits Test Century In All Indian Subcontinent Country)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
केनने दिला पाकिस्तानला पेन! 722 दिवसांनी शतक ठोकत न्यूझीलंडला मिळवून दिली आघाडी
श्रेयसला पुढील कसोटी कर्णधार करण्यासाठी भारतीय दिग्गज आग्रही; म्हणाला, “सध्यातरी तोच…”