इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगाम अखेरच्या टप्प्यात आला आहे. साखळी फेरीतील आता सर्वच संघांच्या अखेरचे सामने बाकी आहेत. असे असतानाच सनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा नियमित कर्णधार केन विलियम्सन न्यूझीलंडला परत जाणार आहे.
सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाने मंगळवारी (१७ मे) मुंबई इंडियन्सला ३ धावांनी पराभूत करत प्लेऑफसाठीच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. कर्णधार म्हणून या प्रवासात विलियम्सनचा (Kane Williamson) महत्त्वाचा वाटा राहिला आहे. असे असतानाच बुधवारी (१८ मे) सनरायझर्स हैदराबादने घोषित केले की, विलियम्सन त्याच्या दुसऱ्या अपत्याच्या जन्मासाठी न्यूझीलंडला परतत आहे.
विलियम्सनची पत्नी सारा लवकरच त्यांच्या दुसऱ्या अपत्याला जन्म देणार आहे. याआधी त्यांना डिसेंबर २०२० मध्ये मुलगी झाली होती. तिच्या जन्माची बातमी विलियम्सनने सोशल मीडियावर पोस्ट करत दिली होती. आता हे दाम्पत्य त्यांच्या दुसऱ्या अपत्याच्या स्वागताची तयारी करत आहेत. त्याचमुळे विलियम्सन आयपीएल २०२२ हंगाम अखेरच्या टप्प्यात असतानाच परत न्यूझीलंडला जात आहे. (Kane Williamson is flying back to New Zealand for birth of his child)
कर्णधार म्हणून विलियम्सनची प्रतिभा आयपीएल २०२२ हंगामात (IPL 2022) दिसली असली, तरी फलंदाजीत तो फार काही खास करता आले. त्याने या आयपीएल हंगामात १३ सामने खेळले असून केवळ १९.६४ च्या सरासरीने २१६ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या एकाच अर्धशतकाचा समावेश आहे. दरम्यान, आता तो परत न्यूझीलंडला जात असल्याने सनराझर्ससाठी उर्वरित आयपीएल २०२२ साठी उपलब्ध राहण्याची शक्यता कमी आहे.
𝑶𝑭𝑭𝑰𝑪𝑰𝑨𝑳 𝑼𝑷𝑫𝑨𝑻𝑬:
Our skipper Kane Williamson is flying back to New Zealand, to usher in the latest addition to his family. 🧡
Here's everyone at the #Riser camp wishing Kane Williamson and his wife a safe delivery and a lot of happiness!#OrangeArmy #ReadyToRise pic.twitter.com/3CFbvN60r4
— SunRisers Hyderabad (@SunRisers) May 18, 2022
हैदराबादच्या प्लेऑफच्या आशा जिवंत
हैदराबादने (Sunrisers Hyderabad) या आयपीएल हंगामात (IPL 2022) आत्तापर्यंत १३ सामने खेळले असून त्यातील ६ सामने जिंकले आहेत आणि ७ सामने पराभूत झाले आहेत. त्यामुळे त्यांचे सध्या १२ गुण असून ते -०.२३० च्या नेटरनरेटसह गुणतालिकेत ८ व्या क्रमांकावर आहेत. हैदराबादला आता अखेरचा साखळी सामना पंजाब किंग्सविरुद्ध खेळायचा आहे. प्लेऑफच्या दृष्टीने हैदराबादसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर या सामन्याआधी होणाऱ्या अन्य संघांच्या सामन्यावरही हैदराबादच्या प्लेऑफची गणिते अवलंबून आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठ्या मनाचा माही! १६ वर्षीय चाहत्याच्या खास पत्राचे ‘कॅप्टनकूल’ धोनीकडून ‘या’ शब्दात कौतुक
महिला क्रिकेटविश्वात निर्विवाद सत्ता गाजवतायेत ऑस्ट्रेलियाच्या रणरागिणी
मुंबई विरुद्धच्या विजयासह हैद्राबादच्या प्लेऑफच्या आशा जिवंत, पण कसं आहे समीकरण? वाचा