सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात आज (२६ सप्टेंबर) आयपीएल २०२०चा आठवा सामना खेळला जाणार आहे. अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर हा सामना पार पडणार आहे. हैदराबाद आणि कोलकाता या दोन्ही संघाचा हा या हंगामातील दूसरा सामना आहे. तर दोन्ही संघांनी त्यांच्या पहिल्या सामन्यात पराभवाचे तोंड पाहिले आहे, त्यामुळे आज विजय मिळवण्यासाठी त्यांच्यात कडी टक्कर होताना दिसेल.
अशात हैदराबाद संघाला सामना सुरु होण्यापुर्वी धक्का बसला आहे. संघातील अनुभवी फलंदाज केन विलियम्सन आजच्या सामन्यातही खेळताना दिसणार नाही. यापुर्वी झालेल्या सामन्यात हैदराबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने विलियम्सनला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा न दिल्यामुळे त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले जात होते. पण नंतर वॉर्नरने सांगितले की, विलियम्सन दुखापतग्रस्त असल्यामुळे त्याने पहिला सामना खेळला नाही. सोबतच त्याची दुखापत जास्त गंभीर नसल्याचेही वॉर्नरने सांगितले होते. Kane Williamson Is Not Playing In Against KKR Match
पण अजूनही विलियम्सनच्या फिटनेसविषयी काही माहिती मिळालेली नाही. माध्यमातील वृत्तांनुसार, विलियम्सन कोलकाताविरुद्धच्या सामन्यात संघाबाहेर राहणार आहे. एवढेच नव्हे तर, तो पुढील १-२ सामनेदेखील खेळू शकणार नाही.
विलियम्सन हा एक दमदार फलंदाज आहे. तो हैदराबाद संघाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नसल्यामुळे संघाची मधळी फळी जास्त मजबूत नसल्याचे दिसून येत आहे. संघाकडे तिसऱ्या क्रमांकानंतर फलंदाजी करण्यासाठी कोणताही अनुभवी फलंदाज उपलब्ध नाही. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात जॉनी बेयरस्टो बाद झाल्यानंतर इतर कोणत्याही फलंदाजाला चांगली फलंदाजी करता आली नाही. अशात आजच्या सामन्यातही हैदराबाद संघाचे वरच्या फळीतील फलंदाज लवकरच बाद झाले, तर संघ मैदानावर संघर्ष करताना दिसेल.
विलियम्सनने आतापर्यंत आयपीएलमध्ये ४१ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ३८.२९च्या सरासरीने फलंदाजी करत १३०२ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
पंजाबचा फिरकीपटू रवी बिष्णोईने स्टिव्ह स्मिथला दिला ‘हा’ इशारा
फलंदाजीत खराब कामगिरी करूनही धोनीचे होत आहे कौतुक, पाहा कारण
जिंकायचे असेल तर ‘या’ गोष्ट कराव्या लागतील, सलग दोन पराभवानंतर एमएस धोनीची प्रतिक्रिया
ट्रेंडिंग लेख –
क्रिकेटच्या ग्राउंडचा राजनयात उपयोग करणारे मनमोहन सिंग तुम्हाला माहित आहेत का?
लालचंद राजपूत यांना पाकिस्तानी व्हिसा मिळावा यासाठी झिम्बाब्वेचे प्रयत्न, ‘हे’ आहे कारण
चेन्नई सुपर किंग्जचा सलग दुसरा पराभव, जाणून घ्या पराभवाची ५ मुख्य कारणे