---Advertisement---

ये राह नही आसान! विश्वविजेता कर्णधारही म्हणे, ‘टी२० विश्वचषकातील सर्व संघ बळकट, काहीही घडू शकत’

On: मंगळवार, ऑक्टोबर 19, 2021 10:01 PM
---Advertisement---

टी-२० विश्वचषक २०२१ सुरू झाला आहे आणि यावेळी आधी पात्रता फेरी सामने खेळले जात आहेत. त्यानंतर सुपर-१२ फेरीची सुरुवात २३ ऑक्टोबरपासून होईल. दरम्यान, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने विश्वचषकासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे. विल्यमसनने विश्वास व्यक्त केला आहे की, या प्रतिष्ठित स्पर्धेत कोणताही संघ कमकुवत नाही आणि ते आपआपल्या सामन्यात मोठा उलटफेर घडवू शकतात.

विल्यमसन याने पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘ही एक अद्भुत स्पर्धा आहे आणि ती बऱ्याच काळानंतर आयोजित केली जात आहे. प्रत्येक संघात सामना जिंकवून देणारे खेळाडू असतात आणि त्यामुळे कोणताही संघ आपआपल्या सामन्याच्या दिवसात कोणत्याही संघाला हरवू शकतो. या स्पर्धेत अनेक आव्हाने असतील. ही एक अतिशय कमी कालावधीत होणारी स्पर्धा आहे. म्हणून तुम्हाला लवकर मैदानावर उतरायचे असते आणि कमी वेळेत लवकर लयीत येण्याचा प्रयत्न करायचा असतो. यासारख्या जागतिक स्पर्धेत जेव्हा तुम्ही दर तीन दिवसांनी वेगळ्या संघाविरुद्ध खेळत असता, तेव्हा तुम्हाला परिस्थितीशी खूप लवकर जुळवून घ्यावे लागते.’

न्यूझीलंडचा कर्णधार पुढे म्हणाला की, ‘विश्वचषक नेहमीच जगभरातील प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी एक मोठे व्यासपीठ प्रदान करतो. त्यातल्या त्यात टी -२० प्रकार हा स्वाभाविकपणे अधिक रोमांचक आणि स्पर्धात्मक असतो. या स्पर्धेत सामील असलेल्या प्रत्येक संघामध्ये मॅच विनर खेळाडू आहेत. याचा अर्थ म्हणजे कोणत्याही दिवशी काहीही होऊ शकते. ही एक मोठी स्पर्धा आहे आणि सर्व संघ या स्पर्धेची वाट पाहत आहेत.’

केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील न्युझीलंड संघ २६ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध विश्वचषक मोहिमेला सुरुवात करेल. न्यूझीलंडला अद्याप टी२० चे जागतिक विजेतेपद मिळवता आलेले नाही आणि त्यांची सर्वोत्तम कामगिरी उपांत्य फेरीपर्यंत (२००७ आणि २०१६) आहे. अशा स्थितीत न्यूझीलंडच्या संघाला प्रथमच जेतेपद पटकावायचे आहे. मात्र, पहिल्या सराव सामन्यात न्यूझीलंड संघाची सुरुवात खराब झाली आणि त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. या संघाच्या क्षमतेवर कोणीही शंका घेऊ नये असे क्रिकेट जाणकार नेहमी सांगत आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

मेरीलेबोन क्रिकेट क्लबने भारताच्या २ दिग्गज खेळाडूंचा केला सन्मान, दिले आजीवन सदस्यत्व

भारत वि. पाकिस्तान संघातील ‘हाय व्होल्टेज’ टी२० विश्वचषक सामने, जे क्रिकेट चाहते आजही नाही शकले विसरु

टी२० विश्वचषकातील सर्वोच्च वैयक्तिक खेळी आहे ‘या’ फलंदाजाच्या नावे, ५८ चेंडूत ठोकल्या होत्या १२३ धावा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---