---Advertisement---

मेरीलेबोन क्रिकेट क्लबने भारताच्या २ दिग्गज खेळाडूंचा केला सन्मान, दिले आजीवन सदस्यत्व

On: मंगळवार, ऑक्टोबर 19, 2021 9:41 PM
---Advertisement---

मेरीलेबोन क्रिकेट क्लबने सन्मान म्हणून १८ आंतरराष्ट्रीय खेळाडूंना (महिला आणि पुरुष) त्यांच्या क्लबचे आजीवन सदस्यत्व दिले आहे. या १८ खेळाडूंमध्ये भारतीय क्रिकेट संघाचे २ खेळाडू देखील आहेत, ज्यात माजी अनुभवी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ आणि फिरकीपटू हरभजन सिंग यांचा समावेश आहे. याशिवाय इंग्लंडचे चार, दक्षिण आफ्रिकाचे चार, वेस्ट इंडीजचे तीन, ऑस्ट्रेलियाचे दोन, श्रीलंका, न्यूझीलंड आणि झिम्बाब्वे यांचा प्रत्येकी एक-एक सदस्य या यादीत समावेश आहे.

इंग्लंडच्या खेळाडूंमध्ये माजी कर्णधार सर ऍलिस्टर कुक, इयान बेल, मार्कस ट्रेस्कोथिक आणि माजी महिला यष्टीरक्षक सारा टेलर यांचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंमध्ये हाशिम आमला, हर्शेल गिब्स, जॅक कॅलिस आणि मॉर्ने मॉर्केल यांचा या सन्माननीय यादीत समावेश करण्यात आला आहे. डेमियन मार्टिन आणि महिला फलंदाज ऍलेक्स ब्लॅकवेल यांची ऑस्ट्रेलियाकडून निवड झाली आहे. या यादीत विंडीजच्या तीन खेळाडूंना सन्मान मिळाला आहे, ज्यात सध्याचे समालोचक इयान बिशप, शिवनारायण चंद्रपॉल आणि रामनरेश सरवन यांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. न्यूझीलंड, श्रीलंका आणि झिम्बाब्वे या तीन अन्य देशांतील अनुक्रमे सारा मॅकग्लॅशन, रंगना हेराथ आणि ग्रँट फ्लॉवर यांना सदस्यत्व देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

मेरीलेबोन क्रिकेट क्लबने सोशल मीडियाद्वारे या बातमीची माहिती दिली आहे. त्यांनी एका ट्विटमध्ये लिहिले की, ‘एमसीसी जगातील काही सर्वोत्तम क्रिकेटपटूंना क्लबचे मानद आजीवन सदस्यत्व प्रदान करत आहे. या विशेषाधिकाराने सन्मानित होणाऱ्या नवीनतम पुरुष आणि स्त्रियांची नावे जाहीर करण्यात आम्हाला आनंद होत आहे.’

इंग्लंडच्या माजी यष्टीरक्षक सारा टेलरने म्हटले की, या यादीत समाविष्ट होणे ही एक मोठी गोष्ट आहे. तिने ट्वीट करून लिहिले, ‘मेरीलेबोन क्रिकेट क्लबकडून मिळालेल्या आजीवन सदस्यत्व सन्मानाच्या यादीत समाविष्ट होण्याचे महत्त्व मी तुम्हाला सांगू शकत नाही. ज्या महान खेळाडूंसोबत माझे नाव यादीत आले आहे ते माझ्यासाठी खूप मोठी बाब आहे. या सन्मानित यादीत समाविष्ट झाल्याबद्दल मी पुरुष आणि महिला खेळाडूंचे अभिनंदन करू इच्छिते.’

महत्त्वाच्या बातम्या-

भारत वि. पाकिस्तान संघातील ‘हाय व्होल्टेज’ टी२० विश्वचषक सामने, जे क्रिकेट चाहते आजही नाही शकले विसरु

टी२० विश्वचषकातील सर्वोच्च वैयक्तिक खेळी आहे ‘या’ फलंदाजाच्या नावे, ५८ चेंडूत ठोकल्या होत्या १२३ धावा

विराटच्या शिलेदाराचा पराक्रम; दोन देशांकडून टी२० विश्वचषक खेळण्याचा केला पराक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---