भारतात होणार वनडे विश्वचषक 5 ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड (ENG vs NZ) यांच्यात विश्वचषकाचा पहिला सामना खेळला जाणार आहे. तत्पूर्वी 29 सप्टेंबरपासून सराव सामने खेळवले जाणार आहे. न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील सराव सामना 29 सप्टेंबर रोजी आयोजित केला गेला आहे. मात्र, या सामन्यापूर्वी न्यूझीलंड संघाच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येतेय.
न्यूझीलंड संघाच्या पहिल्या सामन्यात केन विलियम्सन हा संघाचे नेतृत्व करताना दिसेल. या सामन्यात तो केवळ फलंदाजी करेल. तर दुसऱ्या सामन्यात तो फलंदाजी आणि काही काळ क्षेत्ररक्षण करण्याची शक्यता आहे. मात्र, विश्वचषकातील पहिल्या सामन्यात तो खेळणार नसल्याचे समजते. त्याच्या जागी टॉम लॅथम संघाचे नेतृत्व करेल.
केन विलियम्सन याला आयपीएल 2023 च्या पहिल्या सामन्यात दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आलेली. केन याने अगदी वेगवान पद्धतीने पुनर्वसन करत विश्वचषकापर्यंत आपला फिटनेस सिद्ध केला.
विश्वचषकासाठी न्यूझीलंड संघ-
केन विलियम्सन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेवॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिचेल, जेम्स नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिच सँटनर, ईश सोधी, टीम साऊदी, विल यंग.
(Kane Williamson Unavailable For ODI World Cup Opening Match Against England)
हेही वाचा-
दक्षिण आफ्रिकेला तगडा झटका! वर्ल्डकप 2023पूर्वी मायदेशी परतला कॅप्टन, कोण हाकणार संघाचा गाडा?
BREAKING: विश्वचषकाच्या तोंडावर ऑस्ट्रेलियाने केला संघात बदल, तुफानी फॉर्ममधील खेळाडूला दिली एंट्री