---Advertisement---

तर ठरलं! गुजरातसाठी ‘ही’ भूमिका निभावणार ‘कूल केन’; नेहराने केला खुलासा

On: शनिवार, डिसेंबर 24, 2022 11:47 PM
Kane-Williamson
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव 23 डिसेंबर रोजी पार पडला. या लिलावात आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या खेळाडूंवर बोली लागली. आयपीएल 2022 चा‌ विजेता गुजरात टायटन्स संघानेही अनेक महत्त्वपूर्ण खेळाडू आपल्या संघात सामील करून घेतले. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन याला देखील गुजरातने आपल्या संघात संधी दिली. त्यानंतर संघाचा मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा याने विलियम्सन याच्या संघातील भूमिकेबद्दल एक महत्त्वाचे वक्तव्य केले.

केन विलियम्सन याला तब्बल सात वर्षाच्या प्रवासानंतर सनरायझर्स हैदराबादने संघातून मुक्त केलेले. त्यामुळे या लिलावात त्याच्यावर कोण बोली लावणार, याकडे सर्वांचे लक्ष होते. लिलावात पहिलेच नाव विलियम्सन याचे आल्यानंतर केवळ गुजरात टायटन्सनेच त्याच्यावर बोली लावली. त्यामुळे तो केवळ 2 कोटी रुपयांसह गुजरातचा भाग झाला.

विलियम्सन याला आपल्या संघाचा भाग बनवल्यानंतर मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा म्हणाला,
“आम्ही त्याला विकत घेण्यासाठी इच्छुक होतोच. आम्हाला या गोष्टीचे आश्चर्य वाटले की तो केवळ दोन कोटी रुपयांमध्ये मिळाला. त्याची बोली थोडी आणखी वाढली असती तरी, त्याला घेण्यासाठी आम्ही सकारात्मक होतोच. त्याने स्वतःला आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सिद्ध केले आहे. त्याच्या प्रतिभेवर कोणालाच शंका नाही.”

नेहरा पुढे म्हणाला,
“आम्ही त्याच्यासाठी काही नियोजन केले आहे. तो संघासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसेल. तर कर्णधार हार्दिक चौथ्या क्रमांकावर आणि मिलर पाचव्या क्रमांकावर संघाला मजबुती देतील.”
आपल्या पहिल्याच हंगामात विजेतेपदाला गवसणी घातलेल्या गुजरातने या लिलावात केन विलियम्सन, ओडेन स्मिथ, शिवम मावी, केएस भरत व जोशुआ लिटल असे महत्त्वाचे खेळाडू संघात सामील करून घेतले.

(Kane Williamson Will Play At 3 For Us Nehra Said)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्या बात है! वर्गमैत्रिणीच्या प्रेमात पडत तिलाच बनवली नवरी, पाकिस्तानी गोलंदाजाच्या लग्नाचे फोटो व्हायरल
मित्र कोट्याधीश बनताच ख्रिस गेलने मागितली जुनी उधारी; पूरनला म्हणाला, ‘आता तरी…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---