---Advertisement---

कपिल देव म्हणतात, ‘…तर आयपीएल खेळण्याची गरज नाही

On: शुक्रवार, फेब्रुवारी 28, 2020 7:40 PM
---Advertisement---

भारताचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी काल (27 फेब्रुवारी) भारतीय खेळाडूंना थकला असाल तर आयपीएलमध्ये खेळू नका, असा सल्ला दिला आहे.

‘भारतीय संघाकडून नियमित खेळणाऱ्या खेळाडूंचे पुढील आंतरराष्ट्रीय वेळापत्रक व्यस्त असल्यास, त्यांनी आयपीएलमध्ये खेळू नये,’ असा सल्ला एचसीएलच्या 5व्या आवृत्ती सत्कार समारंभाच्या वेळी कपिल यांनी भारतीय खेळाडूंना दिला आहे.

यावेळी ते म्हणाले, “जर तुम्हाला थकल्यासारखे वाटत असेल तर आयपीएलमध्ये खेळू नका. तुम्ही आयपीएलमध्ये तुमच्या देशाचे प्रतिनिधित्त्व करत नसता. त्यामुळे थकावट वाटत असल्यास आयपीएल दरम्यान ब्रेक घेऊ शकता. जर तुम्ही देशाचे प्रतिनिधित्त्व करत असता तर तुमची भावना वेगळी असते.”

“जेव्हा खेळाडू आपल्या देशासाठी खेळत असतो तेव्हा त्याला उत्कृष्ट खेळण्याची गरज असते आणि त्याने येथे कोणतीही तडजोड करू नये. त्यांनी (खेळाडूंनी) फ्रेंचायझी क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी खूप ऊर्जा खर्च केलेली असते,” असेही ते पुढे म्हणाले.

याव्यतिरिक्त पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पराभवादरम्यान किंवा वनडे मालिकेच्या दरम्यान भारतीय संघातील खेळाडूंमध्ये थकावट असल्याचे कोणते संकेत पहिले होते का? असे कपिल यांना विचारले असता त्यांनी उत्तर देण्यास ‘नकार’ दिला.

“मला माहित नाही. असे टिव्ही पाहून वक्तव्य करणे माझ्यासाठी अवघड आहे आणि मला ते चूकीचे वाटते.” असे कपिल यावेळी म्हणाले.

“ज्यावेळी मी आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळत होतो तेव्हा मलाही थकावट वाटायची. एखाद्या मालिकेत खेळत असताना जेव्हा आपल्याला एकही धाव किंवा विकेट घेता येत नसते, तेव्हा थकवा जाणवू लागतो. परंतु, चांगली खेळी करत असल्यास याची जाणीव होत नाही.” असेही कपिल म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---