भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनने आयपीएल २०२२ मध्ये राजस्थान रॉयल्सला अंतिम सामन्यात पोहोचवले. सॅमसनने कर्णधाराच्या रूपात चांगले प्रदर्शन केले असेल, तरी त्याचे वैयक्तिक प्रदर्शन मात्र अपेक्षित नव्हते. याच कारणास्तव निवडकर्त्यांनी त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत निवडले नव्हते. भारताचे माजी दिग्गज कर्णधार कपिल देव यांनी सॅमसच्या सुमार प्रदर्शनावर निशाणा साधला आहे.
कपिल देव (Kapil Dev) सध्याच्या युवा खेळाडूंचे प्रदर्शन पाहून अनेकदा त्यांचे कौतुक करत असतात. तर काही वेळा एखाद्या खेळाडूने प्रदर्शन त्यांना आवडले नाही, तर त्याच्यावर टीका देखील करतात. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनकडून कपिल देवलच्या ज्या अपेक्षा होत्या, त्यावर तो खरा उतरू शकला नाही. याच पार्श्वभूमीवर त्यांनी सॅमसनला चांगलेच सुनावले आहे.
चालू वर्षाच्या शेवटी ऑस्ट्रेलियामध्ये टी२० विश्वचषक खेळला जाणार आहे. अशात भारतीय संघात यष्टीरक्षकाची जागा मिळवण्यासाठी रिषभ पंत (Rishabh Pant), इशान किशन (Ishan Kishan), दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आणि संजू सॅमसन (Sanju Samson) या चौघांमध्ये स्पर्धा असेल. कपिल देवच्या मते या चौघांपैकी एक यष्टीरक्षक निवडणे अवघड आहे. विश्वचषकासाठी त्यांनी रिषभ पंतच्या नावाला विचारत देखील घेतले नाही, तर संजू सॅमसवर त्यांना उघडपणे नाराजी व्यक्त केली.
कपिल देप म्हणाले की, “जर तुम्ही मला कार्तिक, इशान आणि सॅमसनपैकी यष्टीरक्षकाच्या भूमिकेत एक निवडायला लावला, तर मी म्हणेल सर्वजण समान पातळीवर आहेत. मला यांच्यात जास्त अंतर दिसत नाही. पण जोपर्यंत फलंदाजीची गोष्ट आहे, तर प्रत्येकजण दुसऱ्यापेक्षा चांगला आहे. कोणत्याही दिवशी तिघांपैकी एखादा भारतीय संघाला स्वतःच्या जोरावर विजय मिळून देऊ शकतो. वृद्धिमान साहा या तिघांपेक्षा उत्तम आहे, पण या तिघांची फलंदाजी चांगली आहे. मी संजू सॅमसनवर खूप नाराज आहे. तो खूप गुणवंत खेळाडू आहे. तो एक-दोन सामन्यात धावा करतो आणि पुन्हा अपयशी होऊ लागतो. त्याच्या प्रदर्शनात थोडीही निरंतरता नाहीये.”
दरम्यान, संजू सॅमसनला आतापर्यंत भारतीय संघात अनेक वेळा संधी मिळाली, पण त्याला या संधीचा फायदा घेता आला नाही. सॅमसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १३ टी-२० सामने खेळले आणि यामध्ये अवघ्या १७३ धावा केल्या आहेत. यादरम्यान एकही अर्धशतक त्याने केले नाहीये.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
भारतीय संघात पुनरागमनानंतर मोहम्मद शामी आणि चेतेश्वर पुजाराची भन्नाट प्रतिक्रिया
‘राहुल अनुपस्थित असेल तर, रोहित विराट काय कामाचे नाहीत’, भारताच्या माजी दिग्गजाने व्यक्त केली खदखद
‘आता दबाव आफ्रिकी संघावर’, पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने दिले भारतीय संघाला बळ