भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज सूर्यकुमार यादव ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत चाहत्यांची निराशा करताना दिसला. वनडे मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये सूर्यकुमार गोल्डन डक म्हणजेच पहिल्या चेंडूवर बाद झाला. परिणामी क्रिकेटजगतातून त्याच्यावर जोरदार टीका करण्यात येतेय. यासोबतच त्याच्यामुळे संजू सॅमसन यांच्यावर अन्याय होत असल्याचे देखील म्हटले जातेय. मात्र, भारताचे विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांनी मात्र वेगळी भूमिका घेतली आहे.
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav ) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांमध्ये फक्त तीन चेंडू खेळू शकला आणि एकही धाव करता आली नाही. त्याच्या या खराब कामगिरीनंतर संजू सॅमसन याला डावलले जात असल्याचे म्हटले गेले. संजूची वनडे क्रिकेटमधील सरासरी 66 पेक्षा जास्त आहे. याच कारणाने सूर्यकुमार व संजूची तुलना केली जाते. त्यावर कपिल देव यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. एका मुलाखतीत बोलताना ते म्हणाले,
“सूर्यकुमार आणि संजू यांची तुलना करणे योग्य नाही. सूर्य यापूर्वी चांगला खेळला आहे आणि त्यामुळे त्याला संधी दिली जाते. सूर्याच्या जागी संजू असता तरीही दुसऱ्या खेळाडूच्या नावाने चर्चा झालीच असते. संघ व्यवस्थापनाला त्याच्यावर विश्वास आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापन त्याला संधी देते. संजूला देखील संधी मिळणारच आहे.”
सॅमसनने जानेवारी 2023 मध्ये आपला शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर दुखापतीमुळे त्याला बेंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत काही काळ दुखापतीवर काम करावे लागले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी आणि वनडे सामन्यात देखील सॅमसनला संधी न दिल्याने निवडकर्त्यांवर निशाणा साधला गेला. सध्या सॅमसन आयपीएल 2023 साठी तयारी करत आहे. त्याच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्सने मागच्या काही आयपीएल हंगामांमध्ये जबरदस्त कामगिरी करून दाखवली आहे.
(Kapil Dev Said No Need To Compare Sanju Samson And Suryakumar Yadav)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘द हंड्रेड’ ड्राफ्टमध्ये रिझवान-बाबर ‘दुर्लक्षित’! मुंबई इंडियन्सचा शिलेदार ठरला टॉप पिक
“बीसीसीआय आणि भारतीय संघ पराभवाला घाबरतात”, पाकिस्तानी खेळाडूचे वादग्रस्त विधान