आठ वर्षांच्या मोठ्या काळानंतर लाल चेंडू संघात पुनरागमन केलेल्या भारतीय फलंदाज करूण नायर (Karun Nair) 20 जून पासून सुरू होणाऱ्या इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेत खेळण्यासाठी उत्साहीत आहे. करूण सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे आणि त्याने अनौपचारिक कसोटीमध्ये इंग्लंड लायन्स विरुद्ध दिशतक देखील झळकावले होते.
तसेच आता संपलेल्या आयपीएल 2025 (IPL 2025) हंगामात देखील त्याने दिल्ली कॅपिटलसाठी 8 सामने खेळले आणि एका अर्धशतकासहित 198 धावा केल्या. 33 वर्षीय खेळाडूने 2016 मध्ये मोहालीमध्ये इंग्लंड विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होत आणि चेन्नईमध्ये त्याच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात नाबाद 303 धावा करून सर्वांच लक्ष वेधून घेतल होतं.
या ऐतिहासिक खेळीनंतर देखील त्याने 2017 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध केवळ 3 घरेलू कसोटी सामने खेळले आणि त्यानंतर सलग कमी धावांमुळे तो संघातून बाहेर झाला.
बीसीसीआय द्वारा सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये नायरने म्हटले आहे, मला पुन्हा संधी मिळाल्याबद्दल मी खूप आनंदी आहे, तसेच आभारी आणि भाग्यवान देखील सुद्धा. मी ही संधी दोन्ही हातांनी पकडत आहे, मला विश्वास बसत नाही तसेच मला ही भावना अनुभवायची आहे आणि मैदानावर जाऊन सुद्धा तिचा आनंद घ्यायचा आहे.
प्रशिक्षणाआधी बैठकीत मुख्य प्रशिक्षक गंभीर (Gautam gambhir) यांनी म्हटले, पुनरागमन करणे सोपे काम नाही सात-आठ वर्षानंतर संघात परत स्थान मिळवणे हे सोपे काम नाही. मागच्या वर्षी तुम्ही कितीही धावा केल्या असल्या तरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कधीही हार न मानणे. याच गोष्टीमुळे त्याला संघात पुनरागमन मिळाले आहे आणि ही गोष्ट पूर्ण जगासाठी प्रेरणा देणारी आहे, तुझं संघात स्वागत करूण.
के एल राहुलने (Kl Rahul) देखील म्हटले आहे की, मी त्याला खूप वर्षापासून ओळखतो आणि त्याने येथे युकेमध्ये क्रिकेट खेळताना खूप महिने घालवले जे त्याच्यासाठी खूप कठीण आणि अवघड होते. त्याच्या पुनरागमनाने आमच्यासारख्या मित्रांसाठी त्याच्या परिवारासाठी ही गोष्ट खूप खास आहे, ज्यांनी त्याचा संघर्ष पाहिलेला आहे आणि हे खूप प्रेरणा देणारे आहे. मला आशा आहे की इथे खेळलेल्या काउंटी क्रिकेटमुळे त्याचा अनुभव आणि त्याला कसोटी क्रिकेटमध्ये खेळण्यास मदत मिळेल.






