क्रिकेटटॉप बातम्या

664 ची सरासरी, 5 शतके! विजय हजारे स्पर्धेत स्टार खेळाडूचा धुमाकूळ, टीम इंडियात कमबॅक करणार?

यंदाच्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये सलग चौथे शतक झळकावून करुण नायरने खळबळ माजवली आहे. राजस्थानविरुद्धच्या क्वार्टर फायनलमध्ये त्याने 112 धावा करून विदर्भाला सेमीफायनलमध्ये पोहोचवले. करुण नायरचा उत्कृष्ट फॉर्म त्याचा टीम इंडियामध्ये पुनरागमनाच्या आशा वाढवत आहे.

विदर्भ संघाचा कर्णधार करुण नायरने यंदाच्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये फलंदाजीने कहर केला आहे. रविवार, 12 जानेवारी रोजी, त्याने राजस्थानविरुद्धच्या क्वार्टर फायनलमध्ये स्पर्धेतील त्याचे सलग चौथे शतक झळकावले. त्याचे रूप पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. निर्णायक सामन्यात 112 धावांची शानदार खेळी खेळून त्याने आपल्या संघाला उपांत्य फेरीत पोहोचवले आहे. त्याने हा पराक्रम पहिल्यांदाच केला नाही. या संपूर्ण स्पर्धेत त्याचा फॉर्म अविश्वसनीय राहिला आहे.

वास्तविक, राजस्थानने क्वार्टर फायनलमध्ये विदर्भासमोर 292 धावांचे लक्ष्य ठेवले होते. यश राठोड आणि ध्रुव शोरी यांच्यात 92 धावांची भागीदारी झाली. त्यानंतर यश बाद झाला आणि करुण नायर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात आला. नायरने ध्रुवसोबत भागीदारी करत 77 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. या दरम्यान त्याने 11 चौकार आणि 3 षटकार लगावले. शौरीनेही 114 चेंडूत शतक पूर्ण केले.

विजय हजारे ट्रॉफीच्या या हंगामात करुण नायरने एकूण 6 डाव खेळले आहेत. ज्यात त्याने 264च्या सरासरीने 664 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने 5 शतकेही झळकावली आहेत. 7 सामने खेळणाऱ्या नायरने एकदाच विकेट गमावली आहे. नायरचे हे जबरदस्त फाॅर्म पाहता त्याची टीम इंडियात निवड होणार का हे पाहणे रंजक ठरेल.

करुण नायरने 2011 मध्ये भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 2016 मध्ये त्याला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आणि तिसऱ्या सामन्यातच त्याने त्रिशतक झळकावले. तिसऱ्या सामन्यात एक अद्भुत खेळी करणारा नायर पुढच्या सामन्यात अपयशी ठरला. यानंतर व्यवस्थापनाने त्याला बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला. त्या मालिकेनंतर त्याला पुन्हा टीम इंडियामध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. आता असा जबरदस्त फॉर्म स्वीकारून त्याने भारतीय संघाचे दार पुन्हा ठोठावले आहे.

हेही वाचा-

Champions trophy 2025; या दिवशी होणार टीम इंडियाची घोषणा, मोठी अपडेट समोर
Kho-Kho WC 2025; टीम इंडियाची विजयी सलामी, रोमांचक सामन्यात नेपाळला लोळवलं
IPL 2025 UPDATE; पहिल्या आणि अंतिम सामन्याचे ठिकाण ठरले, या मैदानावर रंगणार प्लेऑफ्सचा थरार

Related Articles