अर्जुन तेंडुलकर याला काही दिवासंपूर्वी गोवा संघाकडून रणजी पदार्पणाची संधी मिळाली. पदार्पणाच्या सामन्यात अर्जुनने संघासाठी शतकीय योगदान दिले असून सर्वत्र त्याचे कौतुक केले जात आहे. पदार्पणाच्या सामन्यात शतक ठोकणाऱ्या अर्जुनला युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांचे मार्गदर्शन लाभल्यामुळे ते देखील चर्चेत आहेत. अशातच आता योगराज सिंग यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अर्जुनने त्याच्या आईपासून लांब राहिले पाहिजे, असा सल्ला दिला आहे.
अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) मागच्या मोठ्या काळापासून रणजी पदार्पणाची वाट पाहत होता. मुंबई रणजी संघात एकापेक्षा एक खेळाडूंची भरमार असल्यामुळे त्याला मुंबईकडून रणजी पदार्पणाची संधी मिळाली नाही. असात रणज ट्रॉफी 2022 पूर्वी अर्जुन गोवा संघासोबत जोडला गेला. अखेर यावर्षी त्याला गोवा संघाकडून पदार्पणाची संधी मिळाली आणि त्याने संधीचे सोने देखील केले. अर्जुनने राजस्थानविरुद्धच्या सामन्यातून रणजी पदार्पण केले आणि यात शतकीय खेळी केली. त्याचे वडील सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यानेही 34 वर्षांपूर्वी रणजी पदार्पणाच्या सामन्यात अशाच प्रकारे शतक केले होते.
अर्जुनच्या प्रदर्शनात झालेल्या या सुधारणेला योगराज सिंग (Yograj Singh) जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे. युवराजच्या वडिलांनी अर्जुनला मागच्या काही दिवसांपूर्वी प्रशिक्षण दिले असून त्याचाच परिणाम त्याने रणजी पदार्पणाच्या सामन्यात दाखवून दिला. अनेकांच्या मते योगराज सिंगांचे मार्गदर्शन अर्जुनसाठी फायदेशीर ठरले आहे. याविषयी बोलताना योगराज म्हणाले की, “मी सचिनला एक गोष्ट बोललो होतो की, ‘अर्जुनला त्याच्या आईपासून दूर ठेव.’ कोणतीच आई त्याच्या मुलाला जखमी, सुजलेल्या किंवा दुखापतीमुळे रक्ताळलेल्या अपस्थेत पाहू इच्छित नसते.”
“मी सचिनला म्हणालो की, मला वाटते अर्जुनने एका गोष्टीवर लक्ष केंद्रीत करावे. तो जे करत आला आहे, तेच पुढेही केले पाहिजे. मी सचिनला म्हणालो की, तुझा मुलगा गुणवंत आङे आणि मुंबई संघाने ही गुणवत्ता गमावली आहे. अर्जुन जगातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंपैकी एक बनणार आहे. मी सिचनसाठी अर्जुनला घडवू इच्छितो. तो युवीसारखाच निडर होईल. त्याला वडीलांच्या सावलीतून बाहेर पडण्याची गरज होती. मी त्याला सांगितले आहे. तु सर्वात आधी अर्जुन आहेस, नंतर अर्जुन तेंडुलकर आणि शेवटची सचिनचा मुलगा,” असेही योगराज पुढे बोलताना म्हणाले. (Keep Arjun away from his mother Yograj Singh’s advice to Sachin Tendulkar)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लाजीरवाणे! पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक मायदेशात परतले, बोर्डाने नाही दिला आठ महिन्यांचा पगार
भारताला धक्का! राहुलला प्रॅक्टिसवेळी मोठी दुखापत, संघाबाहेर पडताच ‘हा’ खेळाडू करणार नेतृत्व