जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड या दोन संघांमध्ये झाला. या सामन्यांमध्ये भारतीय संघाला न्यूझीलंड संघाकडून आठ विकेटने पराभव पत्करावा लागला होता. भारतीय संघाला हा पराभव पत्करावा करावा लागण्यामागे प्रमुख कारण म्हणजे दुसर्या डावात भारतीय संघातील फलंदाज एकामागून एक बाद होत होते. विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांसारखे दिग्गज फलंदाज सहज बाद झाले. याबद्दल न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
केन विलियम्सनचे असे मत आहे होते की, विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा बाद झाल्यानंतरही भारतीय संघाला विजयाची संधी होती. विलियम्सन म्हणाला की, ” रिषभ पंतने भारतीय संघाकडून आक्रमक फलंदाजी केली. पंतच्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे भारताने एक असे असे लक्ष्य गाठले असते, जे आम्हाला पार करणे खूप अवघड गेले असते. काईल जेमिसनने संघासाठी उत्कृष्ट गोलंदाजी केली. कारण जेमिसनने विराट आणि पुजारा यांसारख्या उत्कृष्ट फलंदाजांना बाद केले.”
विलियम्सन पुढे म्हणाला की, “आमच्यासाठी शेवटचा दिवस खूप महत्त्वाचा होता. कारण शेवटच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा निकाल लागण्याची शक्यता दिसून येत होते. आम्ही फक्त उत्कृष्ट कामगिरी करण्याचा प्रयत्न करत होतो. आम्ही फक्त हे बघत होतो की खेळ पुढे कसा जाईल आणि संधी कशी मिळेल. शेवटच्या दिवशी संधी मिळाली आणि सहज गोलंदाजांना विकेट मिळत होते.”
विलियम्सन पुढे म्हणाला की, ” भारतीय संघाने देखील पलटवार केला. भारतीय संघाला ही संधी मिळाली होती. त्याचबरोबर खेळपट्टी देखील गोलंदाजीसाठी चांगली होती. आमच्या संघासाठीही परिस्थिती खूपच अवघड होती.”
त्याचबरोबर विलियम्सन पुढे म्हणाला की, “हे समजणे खूप अवघड होते की सर्वात चांगली तयारी काय असू शकत होती. भारतीय संघ तेवढाच मजबूत प्रतिस्पर्धी संघ होता जितका आम्ही विचार केला होता. भारतीय संघ जगातील सर्वोत्कृष्ट संघ आहे.”
विलियम्सन पुढे म्हणाला की, “जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात अगोदर इंग्लंडचा दौरा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. इंग्लंड सोबत झालेल्या कसोटी मालिकेमुळे आम्हाला योग्य आणि मजबूत संघ निवडण्यासाठी मदत झाली.”
न्यूझीलंडचे हे २००० सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतरचे पहिलेच आयसीसी विजेतेपद आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
क्षणभर विश्रांती! इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय खेळाडू करतायेत इंग्लंडमध्ये ‘चिल’
विम्बल्डनला आली सचिन-विराटची आठवण, शेअर केला व्हिडिओ