---Advertisement---

केशव महाराजची कमाल! हॅट्रिकसह ६१ वर्षानंतर बनला ‘अशी’ कामगिरी करणारा दुसरा गोलंदाज

On: सोमवार, जून 21, 2021 10:54 PM
---Advertisement---

सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष साउथम्पटन येथे सुरू असलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याकडे लागले असताना, वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यानदेखील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना खेळला जात आहे. या सामन्यात सोमवारी (२१ जून) दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराज याने हॅट्रिक घेत दक्षिण आफ्रिका क्रिकेटमधील एक मोठा दुष्काळ संपवला.

केशव महाराजची हॅट्रिक
ग्रास आयलेट येथे वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान सुरू असलेल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराज याने हॅट्रिक घेण्याचा कारनामा केला. वेस्ट इंडीजच्या दुसऱ्या डावातील ३७ व्या षटकात त्याने ही कामगिरी केली. त्याने या षटकातील तिसऱ्या चेंडूवर अर्धशतक करुन खेळत असलेल्या कायरन पॉवेलला एन्रिक नॉर्कीएच्या हाती झेल देण्यास भाग पाडले.

पुढच्याच चेंडूवर संघाचा माजी कर्णधार जेसन होल्डरला त्याने झेलबाद केले. पाचव्या चेंडूवर वेस्ट इंडीजचा युवा यष्टीरक्षक जोशुआ डी सिल्वाला बाद करत आपली हॅट्रिक पूर्ण केली. केशव महाराज दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट इतिहासातील केवळ दुसरा असा गोलंदाज आहे ज्याने कसोटीमध्ये घेतली आहे.

यांनी मिळवलेली पहिली हॅट्रिक
दक्षिण आफ्रिकेसाठी कसोटी क्रिकेटमध्ये पहिली हॅट्रिक घेण्याचा मान जेफ ग्रिफीन यांच्याकडे जातो. त्यांनी १९६० मध्ये इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स कसोटीत ही कामगिरी केलेली. त्यानंतर आता तब्बल ६१ वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाला कसोटीमध्ये हॅट्रिक घेण्यात यश आले.

दक्षिण आफ्रिका विजयाच्या दिशेने
दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकल्यानंतर दुसरा सामनाही दक्षिण आफ्रिका संघ जिंकण्याच्या जवळ आला आहे. दक्षिण आफ्रिकेने आपल्या पहिल्या डावात २९८ धावा केल्यानंतर वेस्ट इंडीजचा पहिला डाव १४९ धावांवर संपुष्टात आला. दक्षिण आफ्रिका संघदेखील आपल्या दुसऱ्या डावात केवळ १७४ धावा करु शकला. दक्षिण आफ्रिकेने ठेवलेल्या ३२४ धावांच्या आव्हानासमोर वेस्ट इंडीजची अवस्था ६ बाद १११ अशी झाली होती.

महत्त्वाच्या बातम्या – 

घरोघरी जावुन पाकिस्तानी क्रिकेटर वाटतोय टुव्हिलर, पाहा काय आहे कारण

‘सांगताना फार दु:ख होतंय, पण एवढे महत्त्वाचे सामने इंग्लंडमध्ये नकोच घ्यायला’

‘या’ कारणामुळे शमी, बुमराह, ईशांत करु शकले नाहीत प्रभावी मारा, न्यूझीलंडच्या दिग्गजाने मांडले मत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---