इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसन आयपीएल २०२२ दरम्यान समालोचकाची भूमिका पार पाडत आहेत. ३० एप्रिल रोजी पीटरसनने भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीची तुलना क्रिस्टियानो रोनाल्डोशी केली आहे. पीटरसनच्या मते मॅनचेस्टर युनायटेडचा महान स्ट्रायकर रोनाल्डो आणि विराट यांच्यात अनेक गुण आहेत, जे एकसारखे आहेत आणि दोघेही स्वतःच्या खेळात सर्वोत्तम आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि गुजरात टायटन्स यांच्यातील हा सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला गेला. यावेळी समालोचन करणाऱ्या केविन पीटरसनने मोठे विधान केले. विराट कोहलीने या सामन्यात मोठ्या खेळीनंतर अर्धशतकी खेळी केली. पीटसरनच्या मते हे अर्धशतक विराटच्या कारकिर्दीसाठी महत्वाचे असणार आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
केविन पीटरसन (Kevin Pietersen) म्हणाला की, विराट कोहलीला मॅनचेस्टर युनायटेड आणि क्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) वर एक नजर टाकण्याची गरज आहे. त्यांच्या वेगवेगळ्या संघांमध्ये आणि दोन वेगवेगळ्या खेळांमध्ये दोन समान ब्रँड आहेत. तुमच्याकडे क्रिकेटच्या शिखरावर विराट कोहली आहे, तर फुटबॉलच्या शिखरावर क्रिस्टियानो रोनाल्डो आहे. एक मॅनचेस्टर युनायटेडसाठी खेळतो, तर एक आरसीबी आणि भारतीय संघासाठी खेळतो. हे मोठे ब्रँड आहेत आणि मोठ्या ब्रँडला देखील जिंकून खेळात स्वतःचे स्थान कायम राखायचे आहे.
पीटरसनच्या मते विराट ज्या पद्धतीने लक्ष्याचा पाठलाग करतो, ते त्याचे सर्वात महत्वाचे कौशल्य आहे. विराटने खेळपट्टीवर लक्ष्याचा पाठलाग करत असताना भारतीय संघाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. पीटरसन म्हणाला की, “विराट माझ्यासाठी भारतातील सर्वात महान फलंदाज आहे. कारण, त्याने भारताला अनेक सामने जिंकून दिले आहेत. त्याच्या या प्रदर्शनावर मला अभिमान आहे.”
गुजरात टायटन्सविरुद्ध विराटने जे अर्धशतक केले, ते त्याने आरसीबीसाठी मोठ्या काळानंतर केले आहे. विराटने या सामन्यात ५३ चेंडूत ५८ धावा केल्या. त्याच्या या प्रदर्शनाविषयी बोलताना पीटसरन म्हणाला की, या खेळीत त्याने काही अप्रतिम शॉट खेळले, जे पाहून मला चांगले वाटले. मला माहिती आहे की, तो एक चॅम्पियन आहे आणि सामना जिंकवून देणारा खेळाडू आहे, पण त्याची ही खेळी सामना जिंकून देण्यासाठी पुरेशी नव्हती.
दरम्यान, गुजरात आणि बेंगलोरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्याचा विचार केला, तर गुजरातने ६ विकेट्सने विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने ६ विकेट्सच्या नुकसानावर १७० धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातने हे लक्ष्य १९.३ षटकात आणि चार विकेट्सच्या नुकसनावार गाठले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियातून ५ वर्षे बाहेर होता सॅमसन, वैतागून आवडती बॅट तोडल्यानंतर आलेला क्रिकेट सोडण्याचा विचार
गुजरात टायटन्सव्यतिरिक्त प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा दम असणारे तीन संघ, कारणही आहे तितकंच खास
मोठी बातमी! आयपीएल २०२२च्या प्लेऑफ आणि महिला टी२० चॅलेंज सामन्यांचे वेळापत्रक जाहीर