---Advertisement---

काय सांगता!! केविन पीटरसनचे पॅन कार्ड हरवले, नरेंद्र मोदींकडे मागितली मदत

On: बुधवार, फेब्रुवारी 16, 2022 2:17 PM
kevin-pietersen, narendra-modi
---Advertisement---

इंग्लंड संघाचा माजी विस्फोटक फलंदाज केविन पीटरसनचे (kevin Pietersen)   हा आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जायचा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक मोठ मोठे विक्रम केल्यानंतर काही वर्षांपूर्वी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले होते. तरीदेखील तो काही ना काही कारणास्तव चर्चेत येत असतो. यावेळी देखील तो एका विशेष कारणासाठी चर्चेत आला आहे.

केविन पीटरसनचे पॅन कार्ड हरवले आहे. हे पॅन कार्ड भारतात हरवल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे केविन पीटरसनने भारतीय क्रिकेट चाहत्यांना पॅन कार्ड शोधून देण्याची विनंती केली आहे. केविन पीटरसनने ही मागणी करताच, भारतीय आयकर विभाग सोशल मीडियावर सक्रिय झाले आहे. त्यांनी या ट्विटला दिलेला प्रतिसाद सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

केविन पीटरसनने ट्विट करत लिहिले की, “माझे पॅन कार्ड हरवले आहे. मी सध्या प्रवास करत आहे. परंतु मला कार्डची आवश्यकता आहे. कोणी मला अशा व्यक्तीकडे पाठवू शकेल का, जो व्यक्ती मला मद करेल..”

या ट्विटची खासियत म्हणजे, हे ट्विट त्याने इंग्रजी नव्हे तर हिंदी भाषेत केले आहे. तसेच या ट्विटमध्ये त्याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)  यांना देखील टॅग केले आहे. हे ट्विट वेगाने व्हायरल झाल्यानंतर, आयकर विभागाच्या ट्विटर अकाऊंटद्वारे त्वरित केविन पीटरसनला मदत करण्यात आली.

https://twitter.com/KP24/status/1493536477237497856?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1493536477237497856%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.india.com%2Fhindi-news%2Fsports-hindi%2Fcricket-news-kevin-pietersen-lost-pen-card-in-india-ask-for-help-from-pm-narendra-modi-income-tax-department-come-in-action-5242213%2F

आयकर विभागाने ट्विट करत लिहिले की, “आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी सज्ज आहोत. जर तुमच्याकडे पॅनकार्ड बद्दल माहिती असेल तर तुम्ही लिंकवर क्लिक करा.” तसेच आयकर विभागाने आपल्या मेल आयडीवर त्यांनी मेल करण्यास सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या :

विराट की रोहित, टी२०ची बादशाहत मिळवणार कोण? वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी२० मालिकेत रंगणार शर्यत

सीएसकेच्या संकटात दुहेरी वाढ, ज्या खेळाडूमुळे झाले होते बॉयकॉट सीएसके ट्रेंड, त्यानेच केली आहे अशी कामगिरी

लाईव्ह ऑक्शनमध्ये चारू शर्मांकडून झालेली ही चूक तुमच्याही निदर्शनात आली नसेल, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---