क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर जास्त तर क्रिकेटपटू समालोचन किंवा प्रशिक्षण क्षेत्राकडे वळतात. काहींनी राजकारणाचा मार्गही निवडला. तर काही फिल्म इंडस्ट्रीकडेही आकर्षित होतात. याव्यतिरिक्त काही खेळाडू स्वत:चा व्यवसाय चालू करण्याचाही विचार करतात.
इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसननेही क्रिकेटमधील निवृत्तीनंतर समालोचनाचे क्षेत्र निवडले. याबरोबरच तो एका शानदार रिसॉर्टचा मालकही आहे. त्याने आपल्या रिसॉर्टची सजावट खूप हटके केली आहे आणि तेवढ्याच सोईसुविधाही उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यामुळे तो ग्राहकांकडून एक रात्र राहण्याचे तब्बल ८८ हजार रुपये घेतो.
https://www.instagram.com/p/CBP0ARplM4S/
पीटरसनचे रिसॉर्ट हे दक्षिण आफ्रिकामधील लेडनबर्ग येथे आहे. त्याने त्याचे नाव ‘उमगानु लॉज’ असे ठेवले आहे. १२ खोलींनी बनलेल्या या लॉजमध्ये प्रत्येक खोली वेगवेगळ्या जनावरांच्या थीमनुसार बनवलेली आहे. ज्या लोकांना जंगली जनावरे बघण्याची जास्त हौस असते, ते आवर्जुन या लॉजमध्ये जातात. तेथे स्विमिंग पुल आणि जिमदेखील आहे.
दक्षिण आफ्रिकामध्ये प्रसिद्ध असलेल्या या उमगानु लॉजमध्ये खोलींच्या खिडक्यांची रचना मोठी करण्यात आली आहे. जेणेकरुन ग्राहकांना गेंडा, सिंह, हत्ती, जंगली म्हैस अशा जनावरांना पाहता यावे. शिवाय प्रत्येक खोलीत टेलिस्कोपही लावण्यात आला आहे.
पीटरसनने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत इंग्लंडकडून १०४ कसोटी सामन्यात ८१८१ धावा केल्या होत्या. यात त्याच्या २३ शतकांचा समावेश होता. तर, वनडेत पीटरसनने १३६ सामन्यात ९ शतके मारत ४४४० धावा आणि टी२०त ३७ सामन्यात ११७६ धावा केल्या होत्या.
ट्रेंडिंग घडामोडी-
-सौरव गांगुलीने चीनी कंपनीच्या सहाय्याने १० हजार संकटग्रस्त कुटुंबाला दिला मदतीचा हात
-आईच्या पोटातच जीवे मारणार होते वडील, आता ओळखला जातो जगात ‘षटकार…