भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज खलील अहमदने नुकतेच ‘क्रिकबझ’ला दिलेल्या एका मुलाखतील आपल्याला क्रिकेटबद्दल असणाऱ्या आवडीबद्दल सांगितले आहे. या दरम्यान त्याने म्हटले की, त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना वाटत होते की, त्याने क्रिकेट खेळू नये. संघातील खेळाडू जेव्हा त्याला बोलावण्यासाठी यायचे, तेव्हा कुटुंबातील व्यक्ती त्यांना हाकलून लावायचे.
तो म्हणाला की, “क्रिकेटपासून एक दिवसापेक्षा अधिक काळ दूर राहिलो तर शरीर क्रिकेटची मागणी करते. लहानपणी मी कधीच विचार केला नव्हता की, मी भारतीय संघासाठी खेळू शकेल. माहिती नव्हते की भविष्य कसे असेल. कशाप्रकारची ही प्रक्रिया असेल आणि कोणत्या प्रकारचे क्रिकेट यामध्ये खेळले जाते काहीच माहित नव्हते. वाटत होते की, स्पर्धा खूप आहे. अकादमीमध्येही अनेक मुले येत होती. असे नव्हते की सुरुवातीपासून भारतीय संघाकडून खेळण्याचे स्वप्न होते.”
“सर्वलोक फलंदाजी करण्यासाठी भांडत होते. त्यामध्ये सर्वजण फलंदाजी करत होते. मला वाटले होते की, कदाचित मी हे भांडण सोडवू शकतो. त्यामुळे मी त्यांना म्हटले की, तुम्ही फलंदाजी करा आणि मी गोलंदाजी करतो,” असे गोलंदाज बनण्याबद्दल बोलताना खलील म्हणाला.
घरात क्रिकेटसाठी भांडण करावे लागत होते. याबद्दल खलील म्हणाला की, “खरंतर मी घरातील सर्वात लहान मुलगा आहे. मला तीन मोठ्या बहिणी आहेत. घरातील सर्व लहान-मोठी कामे मलाच करावी लागत होती. जेव्हा मी खेळण्यासाठी जायचो, तेव्हा ती वेळ ४ तासांची असायची. त्या दरम्यान काही काम शिल्लक राहिले असेल तर मोठी समस्या व्हायची की, काम कोण करेल. त्यासाठी मला भांडावे लागत होते. ते म्हणायचे की, कशाला जातोस खेळायला, थोडे लक्ष अभ्यासावरही दे आणि घरामध्ये रहात जा.”
“राजस्थानमध्ये (Rajasthan) मे-जून महिन्यादरम्यान जर तुम्ही खेळत असाल, तर विचारदेखील करू शकणार नाहीत एवढी उष्णता असते. शुक्रवारी नमाजनंतर आम्ही नेहमी टेनिस चेंडूने खेळत असायचो. तेव्हा लोकांना माझी आवश्यकता असायची. कारण, टेनिस चेंडूवर सर्वजण फलंदाजी करत असतील तर खूप षटकार मारले जात होते.” असे तो आपल्या खेळाबद्दल बोलताना म्हणाला.
“जेव्हा सर्वजण मला बोलावण्यासाठी घरी येत होते, तेव्हा मी ऐकण्यापूर्वीच घरचे ऐकत होते. ते म्हणत होते की, खलील अहमद (Khaleel Ahmed) खेळायला येणार नाही. तुम्हीही घरी जा. खूप उष्णता आहे. यावर आम्ही उपाय शोधला. तेव्हापासून सहकारी घरासमोर यायचे, तेव्हा ते आवाज देण्याऐवजी गाणे गात होते,” असेही तो पुढे म्हणाला.
खलील अहमद आयपीएलमध्ये (IPL) सध्या सनरायजर्स हैद्राबाद (Sunrisers Hyderabad) संघाकडून खेळतो.
अहमदने भारतीय संघासाठी (Team India) आतापर्यंत ११ वनडे आणि १४ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने वनडेत १५ विकेट्स आणि टी२० १३ विकेट्स घेतल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-ये दोसती हम नही तोड़ेंगे! १९ वर्षीय जेमिमाहचं हे खास गाणं आहे तिच्या संघसहाकाऱ्यांसाठी
-शार्दुल ठाकूरनंतर आता टीम इंडियाच्या या खेळाडूनेही केली सरावास सुरुवात
-चाहत्यांनी सांगितले म्हणून केस कापलेल्या भारतीय क्रिकेटपटूचा पहा नवा लुक