fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

खेलो इंडिया: खो खोच्या सामन्यांना आज प्रारंभ

पुणे। सुवर्णपदकांसाठी महाराष्ट्रासाठी हुकमी क्रीडा प्रकार असलेल्या खो खो च्या सामन्यांना आज (रविवार, दि.१३) पासून प्रारंभ होत आहे. १७ वषार्खालील मुले व मुली तसेच २१ वषार्खालील मुले व मुली या चारही गटांमध्ये सुवर्णपदक जिंकण्याची महाराष्ट्राला संधी आहे.

शिवछत्रपती क्रीडानगरीमधील नेमबाजीच्या शॉटगन केंद्राजवळ हे सामने होणार आहेत. रविवारी सकाळी आठ वाजता या सामन्यांना प्रारंभ होणार आहे. त्यासाठी चार कृत्रिम मैदाने तयार करण्यात आली आहेत. त्यापैकी तीन मैदानांवर प्रत्यक्ष सामने होतील तर चौथे मैदान सरावासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. १७ जानेवारीपर्यंत हे सामने होणार आहेत. दररोज सकाळी ८ ते १०-३० व दुपारी ४ ते रात्री ८-३० या वेळेत सामने होतील. सायंकाळचे सामने विद्याुत प्रकाशझोतात होणार आहेत.

खो खो खेळात आतापर्यंत किशोर-किशोरी तसेच कुमार मुले व मुली या गटांमध्ये महाराष्ट्राने राष्ट्रीय स्तरावर दबदबा राखला असल्यामुळे येथेही ते वर्चस्व राखतील अशी अपेक्षा आहे. गतवर्षी महाराष्ट्राने सर्व गटांमध्ये प्राबल्य राखले होते. येथे त्यांना प्रामुख्याने केरळ, गुजरात व कर्नाटक या संघांकडून चिवट लढत मिळेल अशी अपेक्षा आहे. प्रेक्षकांसाठी दोन गॅलºया उभारण्यात आल्या आहेत.

खो खो स्पर्धेतील सामने प्रथम साखळी व नंतर बाद पद्धतीने होणार आहेत. १७ व २१ वषार्खालील मुले व मुली या चारही गटांमध्ये राष्ट्रीय स्तरावरील प्रत्येकी पहिल्या आठ क्रमांकांच्या संघांना स्थान देण्यात आहे. १७ जानेवारी रोजी उपांत्य व अंतिम फेरीचे सामने होतील.

You might also like