जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामात किंग्स इलेव्हन पंजाब संघाला चढ-उतारांचा सामना करावा लागला आहे. मात्र गेल्या २ सामन्यांपासून स्टार फलंदाज ख्रिस गेलने संघात आगमन करत विजयात मोलाचा हातभार लावला. पण मंगळवारी (२० ऑक्टोबर) दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या आयपीएल २०२०च्या ३८व्या सामन्यात लवकरच आर अश्विनने त्याची दांडी उडवली.
झाले असे की, नाणेफेक जिंकत दिल्लीने प्रथम फलंदाजी निवडली आणि पंजाबपुढे १६५ धावांचे आव्हान ठेवले. प्रत्युत्तरादाखल पंजाबचा कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज केएल राहुल २.२ षटकात केवळ १५ धावांवर बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर गेल फलंदाजी करण्यासाठी आला.
पंजाबने राहुलची महत्त्वपूर्ण विकेट गमावल्यामुळे गेल अधिकाधिक धावा करेल, अशी सर्वांना अपेक्षा होती. गेलनेही ३ चौकार आणि २ षटकार मारत १३ चेंडूत २९ धावा केल्या होत्या. पण डावातील ६वे षटक टाकण्यासाठी दिल्लीचा अनुभवी फिरकीपटू अश्विन आला. त्याने षटकातील दूसऱ्याच चेंडूवर शानदार गुगली टाकली आणि गेलचा त्रिफळा उडवला.
महत्त्वाचे म्हणजे, अश्विनने गेलला बाद करण्याची ही पहिली वेळ नव्हती. आयपीएलमध्ये आतापर्यंत गेलने अश्विनचे ८१ चेंडू खेळले आहेत. त्यात गेलला केवळ ६७ धावा करता आल्या आहेत. विशेष म्हणजे, आयपीएलमध्ये याच ८१ चेंडूंचा सामना करताना गेल आश्विनकडून ५ वेळा बाद झाला आहे. आयपीएलमध्ये गोलंदाजांची चांगलीच धुलाई करणाऱ्या गेलने आश्विनविरुद्ध केवळ ८२.७१च्या सरासरीने धावा केल्या आहेत.
अश्विनबरोबरच चेन्नई सुपर किंग्सचा फिरकीपटू हरभजन सिंगनेही गेलला आयपीएलमध्ये ५ वेळा तंबूत धाडलं आहे. या दोघांव्यतिरिक्त उमेश यादव आणि संदीप शर्मा या गोलंदाजांनीही गेलला ४ वेळा बाद केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठ्ठा गेम झाला यार! पूरनमुळे धाव चोरण्याचा सावळा गोंधळ अन् मयंक थेट तंबूत दाखल
‘अरे ही कसली एक्स्प्रेस ही तर झुकझुक मालगाडी’, माजी क्रिकेटरचा चेन्नईवर निशाना
राजस्थानविरुद्धच्या पराभवाची धोनीने सांगितली दोन कारणं
ट्रेंडिंग लेख-
ऐंशीच्या दशकातील पैसा वसूल सामना.! एकट्या ‘ऍलन लॅम्ब’ यांनी वेस्टइंडीजच्या जबड्यातून विजय खेचला
HBD विरू : तो आला..त्याने पाहिलं..अन् त्याने जिंकलं ! भारतीय क्रिकेटचा खराखुरा ‘सुलतान’
सचिन तंबूत परतलेला असताना अझर, सिद्धूने केलेली ती खेळी वर्षानुवर्षे लक्षात ठेवली गेली