वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूंमधील एक आहे. अलीकडेच पोलार्डने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र, जगभरातील टी 20 लीगमध्ये तो अजूनही खेळत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पोलार्डच्या नावावर अजही अनेक विक्रम आहेत, जे कोणालाही मोडता आले नाहीत. अलिकडच्याच काळात पोलार्डने 600 टी-20 सामने खेळम्याचा विक्रम नावावर केला आहे. शुक्रवारी (दि. 12) पोलार्ड वयाच्या 36व्या वर्षात पदार्पण करत आहे. पोलार्डच्या वाढदिवसानिमित्त आपण त्याच्या आकडेवारीवर नजर टाकणार आहोत.
दिग्गजांमध्ये गणला जाणारा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्ड (Kieron Pollard) याने आपल्या कारकिर्दीला 2007 पासून सुरुवात केली. गेली 15 वर्ष किरॉन पोलार्ड आपल्या चाहत्यांचे भरभरून मनोरंजन करत आहे. दरम्यान, पोलार्डने त्याच्या 15 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये अनेक विक्रमांवर (Special Record Kieron Pollard) आपले नाव कोरले आहे. पोलार्डने 123 वनडे, तर 101 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. वनडेत 2706 आणि टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये 1569 धावांची नोंद त्याच्या नावापुढे आहे.
मात्र टी 20 लीगमध्ये खेळणार किरॉन पोलार्ड
पोलार्ड आयपीएलमध्ये (IPL 2023) मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) बरीच वर्षे खेळला. त्याचा टी-20 मधील रेकॉर्ड उत्कृष्ट दर्जाचा आहे. पोलार्डने आपल्या कारकीर्दीत खेळलेल्या 625 टी-20 सामने खेळले आहेत. यात 31.29च्या सरासरीने 12175 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने एक शतक ठोकली आहेत. गोलंदाजाच्या भूमिकेत पोलार्डने 312 विकेट्सही पटकावल्या आहेत. 15 धावा खर्च करून 4 बळी ही त्याची सर्वोत्तम आकडेवारी राहिले आहे.
सर्वाधिक टी-20 सामने खेळणारे खेळाडू
टी 20 मध्ये सर्वाधिक सामने खेळणाऱ्या टॉप-5 खेळाडूंमध्ये कायरन पोलार्डचे नाव पहिल्या क्रमांकावर येते. पोलार्डने 625 टी-20 सामने खेळले आहेत. यादीत दुसरा क्रमांक वेस्ट इंडिजचा आणखी एक दिग्गज ड्वेन ब्राव्हो (Dwayne Bravo) याचा आहे. ब्राव्होने 558 टी-20 सामने खेळले ब्राव्होनंतर पाकिस्तानचा शोएब मलिक (Shoaib Malik) 510 टी-20 सामने खेळले आहेत. (Kieran Pollard’s 36th birthday)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लय भारी! ऑस्कर विजेत्या The Elephant Whisperers टीमला भेटला धोनी, गिफ्ट म्हणून दिली ‘ही’ खास वस्तू
‘त्यांनी मला फोन करून…’, खराब फॉर्ममध्ये असताना टीका करणाऱ्यांबद्दल नितीश राणाचा धक्कादायक खुलासा