पाकिस्तान सुपर लीग (PSL) चा 26 वा सामना लाहोर कलंदर आणि कराची किंग्ज यांच्यात खेळला गेला. या सामन्यात कराची किंग्जनं लाहोर कलंदरचा 3 गडी राखून पराभव केला.
या सामन्यादरम्यान एक मजेशीर घटना घडली. मॅचमध्ये कराची किंग्जचा स्टार अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डची शॉट मारताना चक्क बॅटच तुटली. डावाच्या 13 व्या षटकात पाकिस्तानचा गोलंदाज तय्यब अब्बासनं ऑफ स्टंपच्या बाहेर असा चेंडू टाकला, ज्यामुळे पोलार्डच्या बॅटचे दोन तुकडे झाले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसून येतं की लाहोर कलंदरचा गोलंदाज तय्यब अब्बासनं इतक्या वेगानं चेंडू टाकला की त्यामुळे किरॉन पोलार्डची बॅट तुटली. या चेंडूवर पोलार्डनं पूर्ण ताकदीनिशी शॉट खेळला. मात्र शॉट खेळल्यानंतर बॅटचे दोन तुकडेच झाले. तुटलेल्या बॅटचं हॅन्डल मात्र पोलार्डच्या हातातच राहिलं. तय्यबनं टाकलेला चेंडू 137.5kph च्या वेगानं होता. हे पाहून क्षणभर पोलार्डही चकित झाला.
यानंतर पोलार्डनं बॅटशिवाय धावत एक रन पूर्ण केला. यानंतर दुसरी बॅट मागवण्यात आली. मात्र पोलार्ड पुढच्याच चेंडूवर तय्यबचा बळी ठरला. तो अवघ्या 3 धावा करून स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला.
The 𝐛𝐚𝐭 𝐛𝐫𝐞𝐚𝐤𝐢𝐧𝐠 moment! 🏏🤯#HBLPSL9 | #KhulKeKhel | #KKvLQ pic.twitter.com/YViuvbGECx
— PakistanSuperLeague (@thePSLt20) March 9, 2024
9 मार्च रोजी झालेल्या PSL 2024 च्या सामन्यात, कराची किंग्जनं लाहोर कलंदर्सचा 3 विकेट्सनं पराभव केला. या सामन्यात कराची किंग्जनं नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना लाहोरनं 20 षटकात 5 बाद 177 धावा केल्या. कलंदरसाठी फखर जमाननं 54 धावा आणि अब्दुल्ला शफीकनं 55 धावांची अर्धशतकी खेळी केली. याशिवाय सिकंदर रझानं नाबाद 22 आणि डेव्हिस वेसनं नाबाद 24 धावांचं योगदान दिलं.
प्रत्युत्तरात, 178 धावांचा पाठलाग करताना कराची किंग्जनं शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. जेम्स व्हिन्सनं 42 धावांची शानदार खेळी केली. तर शोएब मलिकनं नाबाद 27 धावा आणि इरफान खाननं नाबाद 35 धावा जोडल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2024 चा सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर खेळाडू कोण? दोघांमध्ये आहे तब्बल 23 वर्षांचं अंतर!
टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाणार का? दुबईत होणार महत्त्वाची बैठक
“रोहित शर्मानं 2025 मध्ये चेन्नईकडून खेळावं”, माजी क्रिकेटपटूच्या वक्तव्यानं खळबळ