---Advertisement---

हार्दिक म्हणतो, ‘पोलार्ड मनाने गुजराती, पैसे गुंतवायच्या बाबतीत तो भारतीयाप्रमाणे काम करतो’

On: सोमवार, ऑक्टोबर 18, 2021 10:46 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या सध्या भारतीय संघासोबत टी२० विश्वचषकात सहभागी झाला आहे. हार्दिकने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. यावेळी हार्दिकने महेंद्रसिंग धोनीला त्याचा भाऊ, तर मुंबईचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डला दादा म्हटले आहे. आयपीएलमध्ये पोलार्डसोबत मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्याचे चांगले संबंध बनले आहेत आणि तो नेहमी त्याच्याकडून सल्ले घेत असतो, असेही पांड्याने सांगितले आहे.

पैशाचे काय महत्त्व असते, ही गोष्ट पंड्याने पोलार्डकडून शिकली आहे. याबाबत त्याने इएसपीएन क्रिकइन्फोशी मुलाखत देताना म्हटले की, “आम्ही त्याला दादा म्हणतो. तो वेस्टइंडीजचा आहे, पण प्रत्यक्षात तो मनाने गुजराती आहे. तो खरोखर एका भारतीयाप्रमाणे काम करतो. तो एक असा व्यक्ती आहे, ज्याला प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करायला आवडते. तो एक असा व्यक्ती आहे, जो एक गाडी विकत घेण्याऐवजी प्रॉपर्टीमध्ये पैसे लावू इच्छितो. तो म्हणतो की, गाडी विकत घेणार नाही, कारण पैसा तेथे वाढणार नाही.”

“ज्याप्रमाणे कुणाल पंड्या माझ्यासाठी आहे, अगदी त्याचप्रमाणे पोलार्डही आहे. तो बऱ्याच काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आहे. त्याच्याकडून मी खूप काही शिकलो आहे. जेव्हा मला एखादी गोष्ट चांगली वाटत नाही, तर मी स्पष्टपणे बोलतो. अशा प्रसंगांवेळी त्याने मला खूप काही शिकवले आहे. मला शांत केले आहे. कृणालमुळेच आमचे त्याच्यासोबत संबंध तयार झाले. २०१५ मध्ये आयपीएल दरम्यान मी त्याच्यासोबत बोलत नव्हतो. आमची फक्त हाय हॅलो होती. २०१६ मध्ये जेव्हा कृणाल आला, तेव्हा आमच्यातील जवळीकता वाढली. आता तो आमचा दोस्त किंवा संघाचा सहकारी नाही, तर कुटुंबाचा सदस्य आहे,” असेही पंड्या म्हटला.

पंड्या पुढे बोलताना म्हणाला की, “मी माझ्यातील कमतरता स्वीकारतो. कारकीर्दीच्या सुरुवातच्या दोन वर्षात खूप भटकाव होता, पण आमचे कुटुंब एकमेकांच्या खूप जवळ आहे. कुटुंबात एक गोष्ट साफ आहे की, मी चुकीचा आहे, तर आहे. प्रत्येक जण त्याचे मत मांडतो आणि जर कोणी भटकायला लागले, तर त्याचे पाय जमिनीवर ठेवण्यासाठी कुटुंब मदत करते.”

महत्त्वाच्या बातम्या – 

वेस्ट इंडिजविरुद्ध दिसला बाबरच्या मनाचा मोठेपणा; अशी दाखवली खिलाडूवृत्ती

अखेर संभ्रम मिटला! विश्वचषकात ‘या’ क्रमांकावर खेळणार विराट

त्यावेळी हार्दिकला गादीवर झोपायला सांगत स्वत: धोनी खाली झोपला, अष्टपैलूने दिला आठणींना उजाळा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---