---Advertisement---

VIDEO | ‘बाएं हाथ का खेल!’, कायरन पोलार्डने एका हाताने कुटल्या १० धावा

On: शुक्रवार, ऑगस्ट 5, 2022 8:10 PM
Kieron Pollard
---Advertisement---

वेस्ट इंडीज संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज अष्टैपलू खेळाडू कायरन पोलार्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून काही महिन्यांपूर्वी निवृत्त झाला आहे. असे असेल तरी, पोलार्ड अजूनही जगभरातील टी-२० आणि टी-१० लीग खेळत आहे. सध्या इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या द हंड्रेड  लीगमध्ये पोलार्ड लंडन स्पिरीट्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. गुरुवारी (४ ऑगस्ट) खेळल्या गेलेल्या एका सामन्यात त्याने दोन असे शॉट्स खेळले, ज्याची चांगलीच चर्चा होत आहे. 

लंडन स्पिरीट्स आणि ओव्हल इनव्हिन्सिबल्स या दोन संघात हा सामना खेळला गेला. कायनर पोलार्ड (Kieron Pollard) प्रतिनिधित्व करत असलेल्या लंडन संघाने हा सामना ३ धावांनी जिंकला. पोलार्डने संघाच्या विजयात १९ धावांचे योगदान दिले, जो महत्वाचे होते. या धावा पोलार्डने एक चौकार आणि एका षटकाराच मदतीने केल्या. विशेष बाब म्हणजे पोलार्डने हे दोन्ही शॉट्स एका हाताने खेळले, ज्यामुळे त्याची चर्चा होत आहे. फॅनकोडने शेअर केलाला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पोलार्डने दाखवला एका हाताचा दम –
पोलार्डने आधी सॅम करनच्या चेंडूवर एका हाताने दमदार शॉट खेळला. गोलंदाज करनने हा चेंडू पॉलार्डला यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला, पण काही इंचा कमी पडल्यामुळे पोलार्डने त्याचा फायदा उचलला. पोलार्डने त्याने या चेंडूवर स्क्वेयर लेगच्या दिशेने चौकार ठोकला.

त्यानतंर पोलार्डने सॅम करनचा भाऊ टॉम करनच्या चेंडूवर पुन्हा एका हाताने शॉट खेळला. हा शॉट मागच्या वेळच्या शॉटपेक्षा अधिक जोरदार होता. करनने टाकलेला हा चेंडू शॉर्ट होता, जो फलंदाजने पुन्हा एकता स्क्वेयर लेगच्या दिशेने मारला, जो थेट हवाई मार्गे सीमारेषेपार जाऊन पडला. पोलार्डने या शॉटनंतर प्रेक्षकांमध्ये जोरदार उत्साह पाहायला मिळाला.

दरम्यान, सामन्याचा विचार केला, तर प्रथम फलंदाजी करताना लंडनने ६ विकेट्सच्या नुकसानावर १७१ धावा केल्या. प्रत्युत्तार ओव्हल संघ मर्यादित २० षटकांमध्ये ७ विकेट्सच्या नुकसानावर १६८ धावा करू शकला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

पीकेएल ऑक्शनचे बंपर ओपनिंग, पहिल्याच खेळाडूच्या खिशात तब्बल ‘इतके लाख’

अश्विन टी२० वर्ल्डकप खेळणार का? भारतीय दिग्गजाने दिले जरा स्पष्टच उत्तर

रवी शास्त्रींच्या ‘त्या’ वक्तव्यावर भारतीय दिग्गजाची विरोधी भूमिका, वाचा सविस्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---