Loading...

कोहलीच्या ‘नोटबुक सेलिब्रेशन’वर विंडीज कर्णधार पोलार्डने केले मोठे भाष्य

काल (6 डिसेंबर) हैदराबाद येथे भारत विरुद्ध विंडीज (India vs Windies) संघात पहिला टी20 सामना पार पडला. या सामन्यात भारताने 208 धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करताना 6 विकेट्सने विजय मिळवला. भारताच्या या विजयात कर्णधार विराट कोहलीने(Virat Kohli) 50 चेंडूत नाबाद 94 धावांची अर्धशतकी खेळी करत महत्त्वाचा वाटा उचलला.

Loading...

या सामन्यात विराटच्या अर्धशतकी खेळी बरोबरच विराटचे ‘नोटबुक सेलिब्रेशन’ (Notebook Celebration) सध्या चर्चेत आहे. सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओही जोरदार व्हायरल होत आहे.

विराटच्या या सेलिब्रेशन संदर्भात विचारले असता विंडीज संघाचा कर्णधार कायरन पोलार्ड (Kieron Pollard) म्हणाला की, फलंदाज स्वत: ला प्रोत्साहित करण्यासाठी हे करतात. मी ठीक आहे. हा खेळाचा एक भाग आहे. कधीकधी आपल्याला धावा करण्यासाठी स्वत: ला प्रोत्साहन म्हणून हे करावे लागते.

या सामन्यात केसरिक विल्यम्सने (Kesrick Williams) गोलंदाजी केलेल्या 16 व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर विराटने षटकार मारला. या षटकारानंतर विराटने त्याची बॅट पायाला टेकवून ठेवली आणि वहीत नोंद करण्यासारखी (नोटबूक सेलिब्रेशन) कृती केली. ज्याला नोटबुक सेलिब्रेशन असेही म्हटले जात आहे.

पण सामन्यानंतर त्याच्या या सेलिब्रेशनमागील कारण सांगताना विराट म्हणाला की विल्यम्सने 2017 ला जेव्हा जमैकाला झालेल्या सामन्यात त्याला 39 धावांवर बाद केले होते, तेव्हा साधारण अशाच पद्धतीचे सेलिब्रेशन विल्यम्सने केले होते. त्या सेलिब्रेशनचे हे उत्तर होते.

Loading...
Loading...

पोलार्डने या सामन्यानंतर वेस्ट इंडीजच्या फलंदाजांचे कौतुक केले. परंतु, गोलंदाजीत शिस्तीचा अभाव असल्याचेही त्याने सांगितले.

Loading...

या सामन्यात वेस्ट इंडीजने प्रथम फलंदाजी करताना पाच गडी राखून 207 धावा केल्या. पण भारताने 208 धावांचे हे लक्ष्य 18.4 षटकांत सहज गाठले.

या सामन्यानंतर पोलार्ड म्हणाला की, ‘आम्ही चांगली फलंदाजी केली. आम्ही 200 पेक्षा जास्त धावा केल्या. असे बर्‍याचदा घडत नाही. तसेच गोलंदाजीत शिस्तीचा अभाव दिसून आला.’

‘आम्ही अतिरिक्त 23 धावा दिल्या, त्यापैकी 14 किंवा 15 वाइड बॉल होते, म्हणजेच अतिरिक्त चेंडूही दिले. भारतासारख्या संघाला अतिरिक्त धावा आणि चेंडू देण्याचा परिणाम स्विकारावाच लागेल,’ असे पोलार्ड म्हणाला.

‘आम्ही आमची कामगिरी सुधारू आणि उत्कृष्ट खेळू,’ असेही पोलार्ड म्हणाला.

You might also like
Loading...