---Advertisement---

‘रिंकू बाप आहे…’, चाहत्याच्या प्रश्नाचे उत्तर देताना KKRचा मालक शाहरुखचे स्टार खेळाडूबाबत मोठे विधान

On: सोमवार, जून 26, 2023 4:05 PM
Rinku-Singh-And-Shahrukh-Khan
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धा गाजवणाऱ्या युवा खेळाडूंमध्ये रिंकू सिंग याचाही समावेश होतो. रिंकूने त्याच्या विस्फोटक फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले होते. त्याने गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात अखेरच्या षटकात सलग 5 षटकार मारत कोलकाता नाईट रायडर्स संघाला शानदार विजय मिळवून दिला होता. या विजयानंतर रिंकू एका रात्रीत स्टार बनला. एवढंच नाही, तर केकेआर संघाचा मालक शाहरुख खान हादेखील रिंकू सिंग याच्या खेळीने प्रभावित झाला. त्याने रिंकूला त्याच्या लग्नात येण्याचे वचन दिले होते आणि डान्स करण्याचीही घोषणा केली होती. यानंतर आता पुन्हा एकदा रिंकू चर्चेचा विषय ठरत आहे.

शाहरुख खान आणि रिंकू सिंग (Shahrukh Khan And Rinku Singh) या दोघांनी पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले आहे. शाहरुख खान (Shahrukh Khan) याच्या एका वक्तव्यामुळे रिंकू सिंग (Rinku Singh) चाहत्यांव्यतिरिक्त माध्यमांमध्येही चर्चेत आहे. खरं तर, ‘किंग खान’ने रिंकूला ‘बाप’ म्हणाला आहे. त्याने ट्विटरवर एका प्रश्नाचे उत्तर देताना हे भाष्य केले.

ट्विटरवर प्रश्नोत्तराच्या सत्रादरम्यान एका युजरने शाहरुखला प्रश्न विचारला की, “एक शब्द केकेआरचा बच्चा रिंकू सिंग याच्यासाठी.” यावर शाहरुखने असे उत्तर दिले ज्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. त्याने उत्तर देत लिहिले की, “रिंकू बाप आहे, बच्चा नाही.” अशात शाहरुखचे हे उत्तर सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल झाले आहे. हे ट्वीट जवळपास 20 हजारहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.

वेस्ट इंडिज दौऱ्यात होणार निवड?
बीसीसीआयने शुक्रवारी (दि. 23 जून) वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारताच्या वनडे आणि कसोटी संघाची घोषणा केली. मात्र, टी20 संघाची घोषणा अद्याप झाली नाहीये. अशात, चर्चा रंगली आहे की, भारताच्या टी20 संघात रिंकू सिंग (Rinku Singh) याला सामील केले जाऊ शकते. माध्यमांतील वृत्तांनुसार, रिंकूला वेस्ट इंडिज दौऱ्यावर पाठवले जाऊ शकते. वेस्ट इंडिज विरुद्ध भारत (West Indies vs India) संघात 5 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. विशेष म्हणजे, ऑगस्ट महिन्यात आयर्लंड दौऱ्यासाठीही रिंकू भारतीय संघाचा भाग होऊ शकतो.

आयपीएल 2023मधील रिंकूच्या कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर त्याने 14 सामन्यात फलंदाजी करताना 59.25च्या सरासरीने आणि 149.52च्या स्ट्राईक रेटने 474 धावांचा पाऊस पाडला आहे. (king shahrukh khan praised rinku singh said rinku is baap not baccha)

महत्वाच्या बातम्या-
धोनीमुळे ‘Candy Crush’ गेमची चांदी! व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 3 तासात ‘एवढ्या’ लाख लोकांनी केली डाऊनलोड?
टीम इंडियात संधी मिळत नसताना रवी बिश्नोईचा मोठा निर्णय, ‘या’ संघासाठी गाजवणार मैदान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---