किंग्ज इलेव्हन पंजाबचा आयपीएल 2020 चा हंगाम काही खास नव्हता. शेवटच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करूनही संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकला नाही. यावर्षीच्या कामगिरीमुळे किंग्ज इलेव्हन पंजाब संघातील परदेशी खेळाडूंनी प्रचंड निराशा केली. आयपीएल 2020 मध्ये ग्लेन मॅक्सवेल हा पंजाबचा सर्वाधिक फ्लॉप खेळाडू होता आणि पुढील हंगामाच्या आधी संघ त्याला मुक्त करू शकतो. दरम्यान, माजी फलंदाज आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्राने लिलावापूर्वी पंजाबने तीन खेळाडू रिलीझ करायला हवे असे सांगितले आहे.
आकाश चोप्राने एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, पंजाब संघाने आयपीएल 2021 पूर्वी वेगवान गोलंदाज शेल्डन कॉट्रेल, हार्डस विल्जोएन आणि ग्लेन मॅक्सवेल यांना बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे.
या तीन परदेशी खेळाडूंना बाहेर करण्यामागील कारण स्पष्ट करताना माजी फलंदाज म्हणाला, “मॅक्सवेलचा खराब फॉर्म एक मोठी समस्या आहे. परदेशी गोलंदाज ही आणखी एक समस्या आहे. कॉट्रेल काही सामन्यात खेळतोय आणि काही सामन्यात खेळत नाही. अशीच गोष्ट नीशम आणि जॉर्डनची आहे. संघात येण्याचा आणि जाण्याचा मार्ग सतत सुरू असतो. पंजाबने शेल्डन कॉट्रेलला सोडले पाहिजे, त्यांनी हार्डस विल्जोएन यालाही सोडले पाहिजे कारण ते त्याला खेळवत नाहीत तसेच त्यांनी मॅक्सवेललाही सोडले पाहिजे.”
आकाश चोप्राने पंजाबला ख्रिस गेलला संघात ठेवण्याचा सल्ला दिला आणि म्हणाला, “गेलला 41 वर्षांचे असूनही खेळायचे असेल, तर त्यांनी ठेवावे. पण आयपीएल अवघ्या काही महिन्यांनंतर आहे आणि गेल फार महागडा ठरला नाही. त्यामुळे त्यांनी गेलला कायम ठेवून एक्स फॅक्टर असल्याचे सिद्ध करावे.” यावर्षी डिसेंबरमध्ये आयपीएल 2021 चा लिलाव होणे अपेक्षित आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2021 Auction : इशान किशनसह ‘हे’ ३ खेळाडू होऊ शकतात मालामाल
आयपीएल २०२१ च्या लिलावापूर्वी बीसीसीआय करणार ‘या’ टी२० स्पर्धेचे आयोजन?
आयपीएल २०२०मध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ५ धडाकेबाज फलंदाज, इंग्लंडच्या माजी दिग्गजाने केली निवड
ट्रेंडिंग लेख-
‘जिनीयस’ हेमांग बदानीची पुण्यातील ‘ती’ अद्वितीय खेळी
सचिनची ‘ती’ खेळी कधीच विसरली जाणार नाही
भारतीय प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालेले ३ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर