महिला प्रीमियर लीग 2023ची सुरुवात शुक्रवारी (4 मार्च) झाली. मालिकेतील तिसरा सामना रविवारी (5 मार्च) रात्री गुजरात जायंट्स आणि यूपी वॉरिअर्स यांच्यात खेळला गेला. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 170 धावांचे लक्ष्य दिले होते, जे यूपी वॉरिअर्सने तीन विकेट्स राखून गाठले. यूपीच्या विजयात किरण नवगिरे हिचे योगदान महत्वपूर्ण राहिले.
किरण नवगिरे (Kiran Navgire) ही एका शेतकरी कुटुंबातून येते आणि सध्या ती यूपी वॉरिअर्सचे प्रतिनिधित्व करत आहे. रविवारी खेळलेल्या सामन्यात तिने 43 चेंडूंचा सामना केला आणि 53 धावांचे योगदान संघासाठी दिले. यात 5 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. तिच्या फलंदाजीवेळी एक गोष्ट अनेकांच्या लक्षात आली. ती गोष्ट म्हणजे किरणच्या बॅटवर भारतीय संघाचा माजी महान कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याचे नाव लिहिले होते. किरणने यापूर्वीही सांगितले होते की, ती एमएस धोनीची मोठी चाहती आहे.
डब्ल्यूपीएलचा हा पहिला हंगाम सुरू होण्यापूर्वी किरण नवगिरे एमएस धोनीविषयी बोलली होती. “2011 विश्वचषकात एमएस धोनी हे मोठे नाव होते. 2011 विश्वचषकापासूनच मी त्यांना फॉलो करू लागले. त्याआधी मला हेदेखील माहिती नव्हते की, महिला क्रिकेट म्हणून काही असते देखील. मी माझ्या गावातील मुलांसोबत क्रिकेट खेळले.”
You have done something Great When ur parents are cheering & happy in home!!! #KiranNavgire | #WPL pic.twitter.com/3SPD5JQiFA
— `ash MSDian (@ashMSDIAN7) March 5, 2023
27 वर्षीय किरण नवगिरे महाराष्ट्राच्या सोलापुरमध्ये जन्मलेली आहे. एका शेतकरी कुटुंबात जन्मल्यानंतर भारतीय संघापर्यंतचा तिचा प्रवास नक्कीच सोपा म्हणता येणार नाही. भारतीय संघासाठी तिने आतापर्यंत 6 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. पण या 6 सामन्यांमध्ये तिने अवघ्या 17 धावा केल्या. सर्वोच्च धावसंख्या 10 होती. कदाचीत याच कारणास्तव तिला पुढे भारतीय संघातून वगळण्यात आले. पण डब्ल्यूपीएलच्या आपल्या पहिल्याच सामन्यात किरण नवगिरे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. डब्ल्यूपीएलच्या या संपूर्ण हंगामात जर तिने चांगले प्रदर्शन केले, तर ती पुन्हा एकदा भारतीय महिला संघाचे दरवाजे नक्कीच ठोठावू शकते.
"I only ever wanted to play cricket because I dreamt of hitting sixes like Dhoni," – Kiran Navgire #WPL #UPWvGG #GGvUPW pic.twitter.com/CKYZik0bgs
— Karamdeep (@oyeekd) March 5, 2023
दरम्यान, गुजरात जायंट्स आणि यूपी वॉरिअर्स यांच्यातील हा सामना मुंबईच्या डी. वाय पाटील स्टेडियमवर खेळला गेला. किरण नवगिरेसोबतच ग्रेस हॅरिस (Grace Harris) हिदेखील यूपीच्या विजयात सर्वोत्तम योगदान देऊ शकले. संघाला विजयासाठी शेवटच्या षटकात 19 धावा गरजेच्या होत्या. हॅरिसने या षटकात एक चेंडू शिल्लक ठेऊन विजय मिळवला. तिने एकूण 26 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने महत्पूर्ण 59 धावा साकारल्या.
(Kiran Navgire’s half-century in her first WPL match, she was playing with MS Dhoni’s name on the bat)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ग्रेस हॅरिसमुळे गुजरातचा सलग दुसरा पराभव, शेवटच्या षटकात कुटल्या संघाच्या गरजेपेक्षा जास्त धावा
याला क्रिकेट हे नाव! तीन षटकात 5 बळी मिळवूनही ‘ती’ ठरली गुजरातसाठी व्हिलन