आपल्या सर्वांनाचं माहिती आहे की, वेस्ट इंडिज संघाचे खेळाडू क्रिकेटच्या मैदानावर आणि मैदानाबाहेर चाहत्यांचे खूप मनोरंजन करतात. अनेक खेळाडू असे आहेत जे चाहत्यांचे मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाहीत. याच यादीत आंद्रे रसलचे देखील नाव आहे, जो आपल्या खासगी आयुष्यातही तितकाच मनोरंजक आहे. काही दिवसांपूर्वीच कोलकाता नाईट रायडर्सने सोशल मीडियावर आंद्रे रसलचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. (Andre Russell says ‘Subah hone na de’, video post on social media)
आंद्रे रसलने गायलेले गाणे
आंद्रे रसलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रसल गाणे म्हणताना दिसत आहे. तो बॉलिवूड गायक मिका सिंगचे ‘सुबह होने ना दे’ हे गाणं म्हणत आहे. हे गाणं ‘देसी बॉईज’ या चित्रपटातील आहे. हा व्हिडिओ कोलकाता नाईट रायडर्सच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून जागतिक संगीत दिनानिमित्त शेअर केला होता.
या व्हिडिओमध्ये आंद्रे रसलव्यतिरिक्त इतर खेळाडूही दिसत आहेत. तेदेखील व्हिडिओमध्ये रसलसोबत गाणे गात आहेत. चाहत्यांना आंद्रे रसलचा हा अंदाज खूप आवडला आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
https://www.instagram.com/p/CQYYAdxlyfB/?utm_source=ig_web_copy_link
तुम्हाला माहिती असेलच की, आयपीएल 2021 मध्ये आंद्रे रसलने उत्कृष्ट कामगिरी केली नाही. आयपीएल 2021 मध्ये झालेल्या सामन्यांमध्ये केकेआरला सात सामन्यांत पैकी फक्त दोन सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. आयपीएल 2021 स्थगित होण्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स संघ गुण तालिकेमध्ये सातव्या स्थानावर होता.
आंद्रे रसलने इंडियन प्रीमियर लीग खेळण्याची सुरुवात प्रथम 2012 पासून केली होती. 2012-13 दरम्यान तो दिल्ली डेअरडेव्हिल्स या संघाचा भाग होता. परंतु 2014 पासून ते आता पर्यंत आंद्रे रसल कोलकाता नाईट रायडर्स या संघाचेे प्रतिनिधित्व करतो.
महत्वाच्या बातम्या-
लाईव्ह सामन्यात दर्शक देत होते न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंना शिव्या, तपास लागताच काढलं स्टेडियमबाहेर
राखीव दिवसावर ओढावणार का ‘काळ्या ढगांचं संकट’?, पाहा साउथम्पटनच्या हवामानाचे अपडेट
तोच चेंडू, तिच विकेट अन् तेच सेलिब्रेशन; मोहम्मद शमीच्या ‘त्या’ विकेटने आठवला २०१६चा सामना