इंडियन प्रिमियर लिग २०२२ म्हणजेच आयपीएलच्या पंधराव्या हंगामाची शनिवार (२६ मार्च) रोजी मुंबईतील वानखेडे मैदानावर सुरुवात झाली. गतसालचे म्हणजेच आयपीएलच्या १४व्या हंगामातील फायनलमध्ये खेळलेले दोन्ही संघ चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) आणि कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) यांच्यात आयपीएल २०२२चा पहिला सामना झाला. अतिशय रंगतदार झालेल्या या सामन्यात कोलकाताने चेन्नईला पराभवाचे पाणी पाजले. यासह चौदाव्या हंगामातील पराभवाचा वचपा कोलकाताने काढला.
टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेल्या कोलकाता संघाने पहिल्या डावातच सामन्यावर आपली पकड घेतली. चेन्न्ई संघाला १३१ धावांवर रोखत कोलकाताने आपल्या विजयाचा मार्ग अगोदरच सोपा करुन ठेवला होता. अवघ्या ८३ धावांवर चेन्नईचे ५ गडी बाद झाले होते. यानंतर महेंद्रसिंग धोनीची ५० धावांची धमाकेदार खेळी आणि जडेजा, उथ्थप्पा यांची अनुक्रमे २६, २८ धावांंची खेळी यांमुळे चेन्नई १३१ अशी समाधानकारक धावसंख्या गाठू शकली होती. मात्र, गोलंदाजीत चेन्नईच्या गोलंदाजांना फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही.
कोलकाताच्या सलामीवीरांनी संघाला आश्वासक सुरुवात करुन दिली. यात अजिंक्य रहाणे याने ४४ धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. त्यानंतर नितिश राणा, सॅम बिलिंग्स आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनीही फटकेबाजी करत संघाचा विजय सुकर केला.
कोलकाताकडून उमेश यादवने सर्वाधिक २ बळी घेतले. तर चेन्नईकडून डीजे ब्राव्हो याने सर्वाधिक ३ बळी घेतले.
महत्वाच्या बातम्या-
कॅप्टन म्हणून पहिल्याच सामन्यात जडेजाची अक्षम्य चूक! संघाला टाकले अडचणीत (mahasports.in)